शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
4
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
5
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
6
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
7
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
8
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
9
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
10
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
11
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
12
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
13
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
14
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
15
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
16
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
17
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
18
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
19
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
20
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

जमिनीतील पाण्याच्या नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देशात हरितक्रांती आली उत्पादनात वाढ झाली. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाण्याची पातळी खालावत चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : देशात हरितक्रांती आली उत्पादनात वाढ झाली. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाण्याची पातळी खालावत चालली आहे. पाण्याचा अतिउपसा होत असल्याने भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नियोजन करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा किती व कसा वापर करायचा याचे नियोजन महिलांकडून शिकण्यासारखे आहे. पाण्याचा वापर नियोजनबद्ध केल्यास भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष भासणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर विभागाचे क्षेत्रीय डॉ.पी.के. जैन यांनी केले.शहादा येथील मीरा प्रताप लॉनमध्ये केंद्र शासनाच्या जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाचे केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर यांच्यातर्फे स्थानिक स्तरावर भूजल प्रबंधन आणि बजेटिंग या विषयावर तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, पंचायत राज संस्था व शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जैन बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, कार्यकारी अभियंता पी.टी. बडगुजर, कल्याण जाटव, हैदरअली नुरानी उपस्थित होते.डॉ.जैन पुढे म्हणाले की, देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीत पडतो. त्याचवेळी देशातील इतर भागात सर्वात कमी पाऊस होतो. आकडेवारी सांगते की, देशातील १३ टक्के भागात नद्यांना पूर येतात. त्याचवेळी देशातील १८ टक्के भागात सरासरी पर्जन्यमान कमी असते. राज्यातही अशीच परिस्थिती आहे. आज पाण्याची समस्या ‘आ’वासून उभी आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अतिवापर टाळावा. पाण्याचे योग्य नियोजन करावे. गाव पातळीवर पाण्याचे बजेट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरे बाजार, वर्धा जिल्ह्यातील तामसवाडी, उमरी मेघे या गावांचे उदाहरण देऊन ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले.गटविकास अधिकारी गोसावी म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याचे बजेट न झाल्याने भविष्यात वरुणराजाची कृपा झालीच नाही तर भूगर्भातील पाणी जास्त काळ टिकू शकत नाही. यासाठी वॉटर बजेटींग करणे गरजेचे आहे. राज्यात इतर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. सुदैवाने आपल्याकडे फारशी गंभीर परिस्थिती नाही, ती वेळ येऊ नये यासाठी ग्रामसेवक व ग्रामस्थांनी संयुक्तरित्या नियोजन केले पाहिजे. कळंबू येथील ग्रामस्थ व ग्रामविकास अधिकारी आर.आर. बोरसे यांनी म्हणाले की, तापी नदीवर बॅरेजेस झाले पण शेतीला पाणी मिळाले नाही. उपसा योजना कार्यान्वित झाल्या नाही म्हणून सिंचनासाठी पाणी मिळत नाही. देशात समान नागरी कायदा झाला तर लोकसंख्येवर नियंत्रण करता येईल. लोकसंख्या नियंत्रण झाले तर पाण्याचे नियोजनही करता येईल. वृक्ष लागवड मोहीम राबवली जाते त्यासोबत वृक्षसंवर्धनासाठी काही यंत्रणा राबवली गेली पाहिजे, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगिलते. या वेळीभूजल माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सूत्रसंचालन जुनेद अहमद यांनी तर आभार संदीप वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कॅथेरिन लुईस, निर्मलकुमार नंदा, एस.बी. पराडकर आदींनी परिश्रम घेतले.