शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

पावसाळ्यापूर्वी साफसफाईची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी मोठ्या गटारी व नाल्यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.शहरातील प्रमुख भागात असलेल्या मोठ्या गटारांमधील पाण्याचा पावसाळ्यात सुरळीतपणे निचरा होत नसल्याने रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच या पाण्यामुळे डबके साचून डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो व आरोग्याचाही प्रश्न उद्भवतो. डोंगरगाव रस्ता, पालिका प्राथमिक शाळा क्रमांक नऊ व १६, दोंडाईचा रस्ता, कलंदर शहा बाबा दर्गा, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार या भागात नेहमी पाणी शिरते व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पालिकेने डोंगरगाव रस्त्यालगत पालिका प्राथमिक शाळेलगत, दोंडाईचा रस्ता, पुरुषोत्तम मार्केट व नवीन भाजीपाला मार्केटला लागून असलेल्या गटारींची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. या गटारी व नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे निघत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरुन गरीब कुटुंबांचे नुकसान झाले होते.शहरातील शिवसेना कार्यालय, न्यायालय ते हॉटेल पटेल रेसिडेन्सी चौकजवळ असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर घाण व गाळ साचल्याने या नाल्यांमधून नेहमी दुर्गंधी येते. यामुळे या मुख्य रस्त्यावर प्रवास करणाºया नागरिकांना नेहमी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही लोकांनी घरातले घाण पाणी या नाल्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात पूर्वेकडील नाला व मोकळ्या जागेतील पाणी दोंडाईचा रस्त्यालगतच्या नवीन वसाहतींमधील काही नागरिकांच्या घरांमध्येदेखील शिरते. यामुळे या भागातील नाल्यांमधील घाण कचरा व मातीचे ढीग काढून त्यांचे खोलीकरण केल्यास पावसाळ्यात पाण्याची योग्य विल्हेवाट लागून नागरिकांचे होणारे हाल थांबणार असल्याने पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.