शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार योजनेला लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:26 IST

कुपोषण मुक्ती : निधीचा अभाव, प्रशासन म्हणते मागणी करणे आवश्यक

तळोदा : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील अंगणवाड्यांमधील गरोदर मातांना दिला जाणारा अमृत आहार निधी अभावी गेल्या १५ दिवसांपासून बंद असून, संबंधीत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या अंगणवाड्यांना रक्कम उपलब्ध करून देण्याची अपेक्षा लाभार्र्थींनी केली आहे.लोकसंघर्ष मोर्चातर्फे ही बाब उघड करण्यात आली आहे. कुपोषणाचे वाढते प्रमाण कमी करून गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या दोन वर्षापासून डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. ही योजना संबंधीत गावांच्या अंगणवाड्यांमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या अंगणवाड्यांमार्फत स्तनदा व गरोदर मातांना अंगणवाड्यांमध्ये दाखल करून तेथे वरणभात, भाजी पोळी आणि अंडी असा सकस आहार रोज दिला जात असतो. यासाठी शासनाकडून एका लाभार्थ्यास ३५ रूपयांचे अनुदान दिवसाला दिला जात असतो. ही योजना एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत राबविली जाते. संबंधीत प्रशासन आगाऊ त्या अंगणवाडी सेविकेच्या बँक खात्यावर अनुदान वितरीत करत असतात. परंतु तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील अंगणवाडी क्रमांक चार व पाच यांना आहार योजनेची रक्कम दिली नसल्याने या दोन्ही अंगणवाड्यांमध्ये साधारण गेल्या १५ दिवसांपासून अमृत आहार बंद करण्यात आला आहे.या दोन्ही अंगणवाड्या साधारण प्रत्येकी १८ अशा ३६ स्तनदा, गरोदर मातांना आहारापासून वंचित राहावे लागत आहे. आहारासाठी यामाता रोज अंगणवाड्यांमध्ये थेटे घालत आहेत. परंतु अनुदान नसल्याने त्यांना रोज निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली.वास्तविक प्रशासनाकडून तीन महिन्याचे आगाऊ अनुदान संबंधीत अंगणवाडी सेविकास देण्याचे स्पष्ट नियोजन असतांना रक्कम देण्याबाबत का उदासिन धोरण घेतले जात असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अंगणवाडी सेविकांनी आहार योजनेच्या निधीची मागणी प्रशासनाकडे केली आहे, असे असतांना त्यावर कार्यवाही करण्यात न आल्याने लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आहाराची रक्कम मिळालेली असतांना त्या सेविकांनी स्वत:ची रक्कम टाकून आतापावेतो लाभार्र्थींना आहार दिला आहे. त्यात खंड पडू दिला नाही. परंतु त्यांचीही आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आहाराच बंद करावा लागला आहे.याबाबत तळोदा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारले असता आहाराची रक्कम संबंधीत अंगणाडी सेविकांना उलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय निधीची मागणीही त्यांनी करायला पाहिजे, असे सांगण्यात आले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन अंगणवाड्यांना योजनेची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थिंनी केली आहे.दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथील अंगणवाडीतही निधी अभावी अशीच आहार बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथेही प्रशासनाने रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.