या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार सनंसे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, राष्ट्रवादी जिल्हा संघटक एन.डी. पाटील, शहादा तालुका अध्यक्ष माधव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, अर्जुन सोनवणे, अशोक माळी, जमन ठाकरे, रवींद्र मुसळदे, सतीश लोहार आदी उपस्थित होते. बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नंदुरबार दौऱ्याबाबत चर्चा करण्यात येऊन जिल्हा, तालुका, शहर कार्यकारणी निवड व आगामी येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पक्षवाढीबाबत चर्चा करण्यात आली. उदेसिंग पाडवी म्हणाले की, जिल्ह्यात येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी सर्वांनी जोमाने काम करावे. तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यासाठी तयारी करण्याचे त्यांनी सांगितले. शांतीलाल साळी, सुरेंद्र कुवर, माधव पाटील, अर्जुन सोनवणे, सुभाष शेमळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एन.डी. पाटील यांनी तर आभार रवींद्र मुसळेदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेंद्र कुवर, जितूू मोरे, संजय खंडारे, बाळा वळवी, गुड्डू शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसची शहाद्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST