तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ करून सध्या शंभराचा पल्ला गाठलेला असताना खतांच्या किमतीत वाढ केली आहे . डीएपी खताची गोणी पूर्वी एक हजार १८५ रुपयांना मिळत होती ती आता एक ९०० रुपयाला मिळणार आहे. तसेच १०:२६:२६ या खताची ५० किलोंची गोणी एक १४५ रुपयांरवरून एक ७७४ रुपयांना मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक खताच्या गोणीमागे आता शेतकऱ्याला ६०० ते ७१५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. कोरोना महामारीत आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातवरून खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. झालेली भाव वाढ त्वरित कमी करावी म्हणून शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने जाहीर निषेध नोंदवीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव पंडित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नगरसेवक इक्बाल शेख, वाहीद शेख, ॲड. दानिश पठाण, दिनेश पाटील, सुदाम पाटील, शीतल मराठे, रेशमा पवार, शोभा पाटील, ज्योती पाटील, रवींद्र तिरमले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
खत दरवाढीचा शहादा तालुका राष्ट्रवादीतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST