यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, मोहन शेवाळे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाब नाईक, नगरसेवक दानीश पठाण, नगरसेवक मुजू पैलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुकाध्यक्ष माधव पाटील, इकबाल शेख, शहर उपाध्यक्ष सैयद गुड्डू, डी.जी. मोरे, सोनवदचे सरपंच राजेंद्र वाघ, चुडामण सूर्यवंशी, रवींद्र तिरमले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात शहादा येथील कुरेशी समाजाचे अध्यक्ष कामील रज्जाक कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी शहादा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात तालुका सरचिटणीसपदी सुभाष शेमळे, तालुका उपाध्यक्ष सुदाम पाटील, ओंकार पाटील, कुवरसिंग वळवी, राजेश कदम, हिंमत पवार, भिका मराठे, तालुका चिटणीस राकेश थोरात, तालुका सहचिटणीस राजू ठाकरे, नवनाथ वाघ, संजय पाडवी, तालुका संघटक कामील रज्जाक कुरेशी, तालुका सहसंघटक विलास निंकुभ, जमन ठाकरे, न्हानू ठाकरे, प्रताप चव्हाण, दुर्गादास पवार, तालुका प्रसिध्दी प्रमुख विनोद अहिरे आदींना जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन सुरेंद्र कुवर यांनी केले. आभार माधव पाटील यांनी मानले.