शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

नवापुराची निवडणूक नाईक परिवाराभोवतालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : जिल्हा परिषदेच्या दहा पैकी पाच व पंचायत समितीच्या वीस पैकी ११ जागा जिंकूप कॉग्रेसने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : जिल्हा परिषदेच्या दहा पैकी पाच व पंचायत समितीच्या वीस पैकी ११ जागा जिंकूप कॉग्रेसने तालुक्यात गड राखला आहे. दिग्गजांचा जय-पराजय या निवडणूकीत लक्षवेधी ठरला़जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकुण ३० जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाची मोजदाद पालिकेच्या बहुउद्देशिय नगरभवनात बुधवारी झाली. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरु झाली़ ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे दोन पुत्र निवडणुकीत उभे होते. दोघांच्या विजयाचे आकडे सर्वप्रथम सार्वजनिक झाले. अजित नाईक यांनी तालुक्यात क्रमांक एकचे सहा हजार ७५० एवढे मताधिक्य घेउन उमराण गटात विजय मिळविला. शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन व युवक कॉग्रेसच्या विविध पदांवरुन अजित नाईक यांनी केलेले कार्य त्यांच्या उपयोगी पडले. त्यांच्या प्रचाराची नियोजनबध्दता त्यांना क्रमांक एकचे मताधिक्य मिळवुन देण्यासाठी साह्यभुत ठरली. मधुकर उर्फ दिपक सुरुपसिंग नाईक यांनी भरडु गटातुन विजय मिळविला. त्यांचे मताधिक्य दोन हजार ६६१ राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणुन त्यांनी केलेले कार्य पाहता नवख्या मतदार संघातुनही त्यांना विजय मिळाला. भाजपामधून लढत देत गावीत दाम्पत्यही विजयी ठरले. भरत माणिकराव गावीत व संगिता भरत गावीत अनुक्रमे रायंगण व करंजी बुद्रुक गटातुन विजयी ठरले. भरत गावीत यांना तालुक्यात क्रमांक तीनचे पाच हजार ९६७ इतके मताधिक्य मिळाले. त्यांच्या पत्नी संगिता भरत गावीत या क्रमांक दोनचे सहा हजार २५२ इतके मताधिक्य घेउन विजयी ठरल्या.कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा खांडबारा गटात निसटता पराजय झाला. ३१७ मतांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे धरमसिंग ईजा वसावे हे विजयी झाले़ विसरवाडीचे सरपंच बकाराम फत्तेसिंग गावीत यांना चितवी गटातुन पराभवाचा सामना करावा लागला.राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सुरुपसिंग गावीत यांनी त्यांचा पराभव केला़ या गटात अपक्ष बिपीन कैलास गावीत यांनी कडवी झुंज दिल्याने तिहेरी लढत झाली. बिलमांजरे गटातून दिलीप आरजु गावीत यांचा कॉग्रेसचे राया देवजी मावची यांनी पराभव केला़तालुक्यात पंचायत समितीवर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यात कॉग्रेसला यश मिळाले आहे. वीस पैकी दहा जागांवर स्पष्ट विजय व तर झामणझर गटात समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवार अरशिंता उदेसिंग गावीत यांच्या विजयामुळे काँग्रेसने बहुमत प्राप्त करत सत्ता प्राप्त केली आहे़ पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉग्रेसला पाच व भाजपाला चार जागांवर विजय मिळवता आला आहे़करंजी बुद्रुक गटात झालेल्या मतदानापैकी ५९ मते गणनेत कमी निघालीत. त्या मतदारांनी उमेदवार व नोटा या विकल्पाऐवजी शेवटचे एन्ड बटन दाबल्याने ती मते गणनेत आलीच नाहीत. उमेदवार व समर्थकांकडुन हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी त्यांना मतदारांकडुन अनावधानाने झालेल्या तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले.