राज्य व केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची निर्मिती करावी, केंद्र व राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, समाजातील तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रशिक्षण संशोधन संस्था स्वतंत्रपणे सुरू करण्यात यावी, होतकरू तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे, महाराष्ट्र शासन संचालित सर्व महामंडळांचे मातंग समाजबांधवांकडे असलेले थकीत कर्ज माफ करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अधिवेशनादरम्यान पदयात्रा नेण्यात येणार आहे.
या वेळी लहुजी शक्ती सेनेचे राज्य संघटक संतोष अहिरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डाॅ. दिनेश खरात प्रदेश पदाधिकारी देवा कढरे, जितेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, ओंकार पगारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री कढरे, विजय साठे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा संघटक भटू जाधव, संजय पगारे व पदाधिकारी उपस्थित होते.