लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत जिल्ह्यातील कला शिक्षकांसाठी व्हिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघटनेतर्फे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, प्राचार्य आय.डी. पटेल, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, विभागीय अध्यक्ष सुनील महाले, प्रल्हाद ठाकूर, मोहन पटेल, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुरव, भूषण व:हाडे, सुजाता गारोळे, अनिता पाटील, सचिव संकेत माळी आदी उपस्थित होते.मोतीलाल पाटील म्हणाले की, कलाशिक्षक आपल्या चित्रातून बोलतो. विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव देण्याचे काम ते करतात. मागीलवर्षी कला शिक्षकांच्या तासिका कमी करून त्यांच्यावर अन्याय झाला होता. मात्र आता तासिका पूर्ववत करण्यात आल्याने समाधान वाटते. शिबिरातून कला शिक्षकांना विविध प्रात्यक्षिके मिळतात म्हणून अशी शिबिरे नियमित आयोजित करायला पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. सुनील महाले यांनी संघटनेचे महत्त्व सांगितले. तर प्रल्हाद साळुंखे यांनी शिक्षकांवर अन्याय होणार नाही, ज्याच्यावर अन्याय झाला त्यांच्यामागे संघटना खंबीरपणे उभी राहील, असे सांगितले. दुपारच्या सत्रात नरेंद्र सरोदे यांनी वॉटर कलरमध्ये निसर्ग चित्र, धनराज पाटील यांनी काळ्या रंगाच्या शाईने कलाशिक्षकाचे काटरून, योगेश सोमवंशी यांनी पोस्टर रंगात निसर्गचित्र, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी तैल रंगांमध्ये पोटट्रेड करून दाखवले. हेमंत पाटील यांनी संगीत विषयावर मार्गदर्शन केले. भूषण व:हाडे यांनी कला शिक्षकांसाठी बाजारात कोणकोणते नवीन साहित्य आले आहे याची ओळख प्रोजेक्टवर करून दिली. प्रास्ताविक नरेंद्र गोरख गुरव यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार प्रल्हाद ठाकूर यांनी मानले. शिबिरासाठी संकेत माळी, राजेंद्र राजपूत, मनोज मगरे, विष्णू माळी, चंद्रशेखर चौधरी, अशोक मराठे, विशाल कर्णकार, कलीम पिंजारी, रमेश चव्हाण, संजय पाटील, दिनेश पाटील, गणेश चौधरी, सुलक्षणा पाटील व स्काऊटच्या विद्याथ्र्यानी परिश्रम घेतले.
कला शिक्षकांचे प्रकाशा येथे नाशिक विभागीय शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:24 IST