शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा काठावरील आरोग्य यंत्रणा सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 12:48 IST

डनेल उपकेंद्राला कुलूप : कंजाला व मांडवा येथे प्रत्येकी एकच कर्मचारी हजर

वसंत मराठे । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिका:यांनी नर्मदा काठावरील कंजाला, मांडवा व डनेल या तीन आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यावेळी कंजाला व मांडवा येथे प्रत्येकी एकच कर्मचारी हजर होते. उर्वरित सर्व कर्मचारी गैरहजर आढळून आले. डनेल उपकेंद्राला तर कुलूपच लावल्याचे आढळून आले. शासन आदिवासींच्या आरोग्यावर प्रचंड निधी खर्च करण्याचा दावा करीत असले तरी आरोग्य यंत्रणेच्या कामचुकार कर्मचा:यांमुळे दुर्गम भागातील आरोग्याचा पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येते. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषद यंत्रणा काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत असतात. त्यामुळे परिसरातील आदिवासींना आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात   आल्या होत्या. नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यानीही        प्रत्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका:यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी आरोग्य विभागाचे साथरोग अधिकारी डॉ.नारायण लक्ष्मण बावा यांना प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर डॉ.बावा व नर्मदा आंदोलनाचे कार्यकर्ते लतिका राजपूत, चेतन साळवे अशा तिघांनी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील कंजाला, मांडवा व  डनेल या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी  तेथे औषध निर्माता व महिला शिपाई कर्मचारी वगळता उर्वरित सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले होते. कंजाला केंद्रात फार्मासिस्टनेच रुग्ण तपासणी (ओपीडी) केल्याचे विदारक चित्र दिसून आले. गैरहजर कर्मचा:यांचे रजेचे अजर्ही नव्हते. त्यानंतर या पथकाने मांडवा आरोग्य केंद्रास भेट दिली. तेथेही एका महिला कर्मचा:याव्यतिरिक्त सर्वच कर्मचारी अनुपस्थित होते. तथापि, सगळ्यांच्या स्वाक्ष:या कर्मचारी हजेरीत होत्या.  या कर्मचा:यांबाबत पथकाने  विचारले तेव्हा सर्व जण सह्या करून निघून गेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे टेबलावरील  मुदत संपलेल्या औषधी व इंजेक्शनदेखील आढळून आल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.   डनेल येथील आरोग्य उपकेंद्रासही या पथकाने भेट दिली. त्यावेळी या उपकेंद्रालाच कुलूप लावल्याचे दिसून आले. येथील मानसेवी  वैद्यकीय अधिकारी गावात राहत  नाही. गावक:यांना ते केव्हा येतात व केव्हा जातात हेसुद्धा माहीत पडत नसल्याची तक्रार गावक:यांनी पथकाकडे केली. वास्तविक सातपुडय़ातील आदिवासींच्या आरोग्यावर शासन करोडो रुपये खर्च करीत असल्याचा दावा करीत          असले तरी प्रत्यक्षात या आदिवासींना त्याचा किती लाभ मिळत आहे हे या विदारक परिस्थितीवरून दिसते. त्यामुळे या कामचुकार अधिकारी व कर्मचा:यांवर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.