लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शिक्षक असलेल्या नराधम पित्यानेच मोबाईल वरील अश्लिल चित्रफीत दाखवुन अल्पवयीन पोटच्या पोरीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नवापुर पोलीसात दाखल झाला आहे. पोलीसांनी नराधमास अटक केली आहे. पिता पुत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना एक आॅगस्ट रोजी रात्री घडली.पोलीस सुत्रानुसार, शिक्षकी पेशेत असलेल्या नराधम पित्याने १ आॅगस्ट २०२० रोजी रात्रीच्या वेळी आपल्या अल्पवयीन मुलीस मोबाईलमधील अश्लिल नग्न चित्रफीत व फोटो दाखवुन अतिप्रसंग करण्याच्या इराद्याने छेडछाड करुन तिचा विनयभंग केल्याची फिर्याद पिडीत अल्पवयीन मुलीने नवापुर पोलीसात दिली. त्यावरुन संशयित नराधम शिक्षक पित्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी त्या नराधम शिक्षक पित्यास अटक केली असुन पुढील तपास हाती घेतला आहे.
नराधाम बापाचे आपल्याच मुलीशी अश्लील कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:44 IST