शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारकरांची खड्डेमुक्तीसाठी अजूनही प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:24 IST

नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे प्रमुख रस्ते तसेच राज्य मार्गावर काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले आह़े परंतु अजूनही जिल्हा संपूर्णपणे खड्डेमुक्त झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ नंदुरबार शहरातील नंदुरबार-दोंडाईचा रस्ता, नवापूर-पिंपळनेर मार्ग, विसरवाडी ते सेंधवा, तापी पुल आदी मार्गावरील खड्डे अद्याप कायम आहेत़ नवापूर, तळोदा तसेच अक्कलकुवा या ...

नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे प्रमुख रस्ते तसेच राज्य मार्गावर काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले आह़े परंतु अजूनही जिल्हा संपूर्णपणे खड्डेमुक्त झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ नंदुरबार शहरातील नंदुरबार-दोंडाईचा रस्ता, नवापूर-पिंपळनेर मार्ग, विसरवाडी ते सेंधवा, तापी पुल आदी मार्गावरील खड्डे अद्याप कायम आहेत़ नवापूर, तळोदा तसेच अक्कलकुवा या तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आह़े दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अनेक अडथळे आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार यांनी सांगितले आह़े जादा मनुष्यबळाचा वापर.गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील बुजविलेले खड्डे पुन्हा पूर्ववत झाल्याचे सार्वजनिक विभागाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याची ‘रिकव्हरी’ करण्यासाठी जादा मनुष्यबळ वापरण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आह़े नवापूर-पिंपळनेर मार्गनवापूर-पिंपळनेर मार्गाची खड्डयांमुळे मोठय़ा प्रमाणात स्थिती बिकट आह़े येत्या दोन ते तीन दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आह़े या कामासाठी एका युनिट ऐवजी तीन युनिट कार्यान्वित करण्यात आले आह़े त्याच प्रमाणे विसरवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वरील खड्डयांचेही काम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान, नंदुरबारातील अत्यंत वर्दळीचा असलेला नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला जरी यश आले असले तरी अजूनही लहान खड्डे दुर्लक्षीत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे लहान खड्डयांना बुजविण्याचेही आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर असल्याचे सांगण्यात येत आह़े पावसामुळे व्यत्यय आल्याने पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असल्याने येत्या काही दिवसात खड्डे बुजविण्यासाठी काय घडामोडी घडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आह़े