नंदुरबार : नंदुरबारात गेल्या आठवड्यापासून उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़ मंगळवारी नंदुरबारात ४३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़ तर किमान तापमानदेखील वाढून २६ अंशावर पोहचले होते़कच्छ, सौराष्ट्र तसेच पश्चिम राजस्थानातून मोठ्या प्रमाणात उष्ण लहरींचा प्रभाव वाढत असल्याने नंदुरबारसह खान्देशात तापमानाची लाट बघायला मिळत आहे़ वाढत्या तापमानामुळे नंदुरबाराती जनजीवनावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे़ मंगळवारी हवेचा दाब १ हजार २ हेक्टापास्कल इतका कमी झाला होता़ त्यामुळे साहजिकच तामानात वाढ झालेली दिसून आली़ हवेतील आद्रता ४० टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ सोमवारच्या तुलनेत आद्रतेत ४ टक्के वाढ झाल्याने मंगळवारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता़तापमान वाढीमुळे वर्दळीचे रस्तेही दुपारच्या वेळी ओस पडत असल्याचे चित्र दिसून आले़ सकाळी किंवा सायंकाळी नागरिक आपल्या विविध कामांसाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे़वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत आहेत़ दुपारच्या वेळी शेतशिवारांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे़ सकाळच्या वेळीच शेतकरी आपली विविध कामे आटपून घेत आहेत़ दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले असल्याची स्थिती आहे़ सकाळी नऊ वाजेपासूनच तापायला सुरुवात होत असते़ त्यातच दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यासे हाल होत आहेत़
नंदुरबारचा पारा पोहचला ४३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:43 IST