शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

नंदुरबारचा कोरोनाबाधीत मृत्यूदर ९.३७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:34 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत ३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा ९.३७ टक्के इतका आहे. शेजारील जिल्ह्यांच्या मानाने तो कमी असला तरी देशाच्या मानाने तो सर्वाधिक आहे. मृत्यू झालेल्यांंचा वयोगट हा युवक मध्यम वयस्क वे वृद्ध असा आहे. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी नंदुरबारात आढळून आला होता. त्यांच्याच परिवारातील इतर तीनजण देखील आढळून आले होते. नंतर शहादा व त्या पाठोपाठ अक्कलकुवा येथे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक १७ रुग्ण नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल ११ रुग्ण हे शहादा तालुक्यातील आहेत.अक्कलकुवा तालुक्यात चार रुग्ण होते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जिल्ह्यात ९.३७ टक्के इतके आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहादा येथील ३२ वर्षीय युवक, नंदुरबार येथील ७० वर्षीय वृध्दा आणि हिंगणी, ता.शहादा येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याचा अर्थ जिल्ह्यात तरुण, मध्यम वयाचा आणि वृद्ध अशा वयोगटातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील बऱ्यापैकी आहे. ३२ रुग्णांपैकी १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय बामखेडा, ता.शहादा येथील रुग्ण हा नाशिक येथे डिटेक्ट झाला आहे.सोमावल, ता.तळोदा येथील मयत गरोदर महिला देखील नाशिक येथेच डिटेक्ट झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णांची नोंद ही नाशिक येथे करण्यात आली आहे.

आठवडानिहाय मृत्यू संख्या१८ ते २६ एप्रिल - १८ ते १५ मे- १२२ ते २९ मे- १नंदुरबार व हिंगणी येथील अनुक्रमे वृद्धा व व्यक्ती हे अहवाल येण्याच्या आधीच मृत्यू झाले होते. तर शहादा येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता.कोरोनाबाधीतांचा वयोगट०५ ते २० वर्ष - ०३२० ते ४०- १२४० ते ६०- १३६० ते ८०- ०४तपासणी व अहवाल१,२८३ जणांची तपासणी१,२०९ जण निगेटिव्ह३२ जण पॉझिटिव्ह३४ अहवाल प्रलंबीत१९ कोरोनामुक्तपरजिल्हा व राज्यातून आलेले लोकंनंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़शहादा तालुका-७ हजार ३०३़अक्कलकुवा ८ हजार ८६३़तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ नागरिकांनी प्रवेश केला होता़एकूण ६० हजार ८६२ जिल्ह्यात प्रवेश केला.

जिल्ह्यात कोरोना मृत्यूदर हा दहा टक्केचा आत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जिल्ह्यात बऱ्यापैकी यश आले आहे.-डॉ.आर.डी.भोये, जिल्हा शल्य चिकित्सक. नंदुरबार.