शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

नंदुरबारात पुढील आठवडाही उष्णतेचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:44 IST

नागरिक बेजार : आद्रतेने फोडला घाम, ऑक्टोबर ‘हिट’चा तडाखा वाढणार

नंदुरबार : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नंदुरबारातील तापमानात सातत्याने वाढ होत आह़े तापमान 36 ते 38 अंशावर स्थिर आह़े  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडासुध्दा उष्णतेचाच ठरणार असल्याचे सांगण्यात येत  आह़े संपूर्ण नंदुरबार जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायेत आह़े परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यातच यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प होत़े अवघे 67 टक्के पाऊस झाल्याने  जमिनीत पाणीदेखील मुरले नाही़ परतीच्या पावसावर सर्व भिस्त असताना प्रत्यक्षात नैऋृत्य मान्सून वारे उत्तर महाराष्ट्रात फिरकलेच नसल्याने साहजिकच पावसाअभावी सप्टेंबर महिनाही कोरडाच गेला होता़ या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान निर्माण झालेले आह़े परिणामी दिवसाच्या तापमानात वाढ होतेय तर, रात्री आद्रता वाढतेय़आद्रतेने फोडला घामनंदुरबार शहराच्या तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे आद्रतेतही रोज 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होत आह़े शनिवारी वातावरणात तब्बल 33 टक्के इतकी आद्रता नोंदविण्यात आलेली आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारकर दुपारी तसेच रात्रीदेखील घामोघाम होत असल्याचे सांगण्यात येत आह़े ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार शहराचे तापमान साधारणत: 35 अंशार्पयत स्थिर होत़े यात 1 ते 2 अंशाने वाढ होऊन सध्या तापमान 36 ते 38 अशांर्पयत जावून पोहचले आह़े पुढील आठवडय़ात अजून 1 अंशाने वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आह़े ढगाळ हवामान कायमशनिवारी दुपारी कडक उन्ह तर काही काळ ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली होती़ ढगाळ हवामान असले तरी दिवसभर व रात्रीही उकाडा कायम होता़ दिवसभर उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झालेली आह़े नंदुरबारकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत असून पुढील आठवडाही वातावरण उष्ण राहणार असल्याने याचा फटका पिकांनाही बसणार असल्याचे स्पष्ट आह़े थंडीतही उष्णतेचा प्रभावयंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झालेली आह़े यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरलेले नाही़ परिणामी उष्ण लहरींचा प्रभाव जास्त राहणार आह़े साधारणत डिसेंबरपासून हिवाळ्याला सुरुवात होत असत़े परंतु यंदाचा हिवाळा उशिरा सुरु होणार असून त्यातही उष्णतेचा प्रभाव अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांना याची झळ पोहचत असून सर्व वयोगटातील नागरीक यामुळे प्रभावित होत आह़े जिल्ह्याला परतीच्या पावसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या़ परंतु प्रत्यक्षात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आह़े रविवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 37 टक्के, सोमवार - 35 अंश सेल्शिअस आद्रता 39 टक्के, मंगळवार - 37 अंश सेल्शिअस आद्रता 32 टक्के, बुधवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 41 टक्के, गुरुवार - 38 अंश सेल्शिअस आद्रता 43 टक्के, शुक्रवार- 36 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्के, शनिवार- 37 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्क़े