लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : हगणदारीमुक्त अभियानात उल्लेखनिय काम करणा:या जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिका:यांचा मुंबई येथील मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ या वेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारीका बारी, तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर, शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे तसेच जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्ह्यात उत्तम कार्य करणारे अधिकारी तसेच कर्मचा:यांना या वेळी गौरविण्यात आल़े या वेळी बबनराव लोणीकर यांनी राज्यातील 34 जिल्ह्यातील पैकी 32 जिल्हे हगणदारीमुक्त झाले असून येत्या काळात संपूर्ण राज्य हगणदारीमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली़ हगणदारीमुक्त झालेल्या अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, परभणी, यवतमाळ, बुलढाणा या सात जिल्ह्याच्या पदाधिकारी तसेच अधिका:यांचा सत्कार करण्यात आला़
उल्लेखनिय कार्याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचा मुंबईत झाला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:13 IST