शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar: तापी पट्ट्यात अवकाळी पावसाची हजेरी, यात्रेकरूंचे नुकसान   

By मनोज शेलार | Updated: January 10, 2024 17:28 IST

Nandurbar Unseasonal rain : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. सारंगखेडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली होती. 

- मनोज शेलार नंदुरबार - जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. सारंगखेडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली होती. 

दरम्यान, पावसामुळे गारवा निर्माण होण्याऐवजी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढल्याने तापमानात फारसा फरक पडला नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी काही भागात तुरळक पाऊस झाला होता. मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. सायंकाळी मात्र तापी काठावरील अनेक भागात पाऊस झाला. काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. सारंगखेडा व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने या भागात अधिक नुकसान झाले. शिवाय सध्या सारंगखेडा यात्रा सुरू असल्याने यात्रेकरू आणि यात्रेत आलेल्या विविध विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली होती.

खाद्यपदार्थांसह विविध खेळणी विक्रीच्या दुकानांना याचा सर्वाधिक फटका बसला होता. इतर भागात मात्र तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसला. त्यामुळे महिनाभरातील सलग दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाल्याने यंदा या दोन्ही पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस