शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विरोधाला विरोध न ठेवता सर्वसमावेशक विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:49 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :पालिकेतील एकुण 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना शहर विकास आणि आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्याचे नव्याने आव्हान राहणार आहे. सुदैवाने नगराध्यक्षपदी दिर्घ अनुभव असलेल्या र}ा रघुवंशी असल्याने शहराचा सर्वागिन विकास होईल आणि विकासाची गती कायम राहील. सत्ताधारी आणि ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :पालिकेतील एकुण 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना शहर विकास आणि आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्याचे नव्याने आव्हान राहणार आहे. सुदैवाने नगराध्यक्षपदी दिर्घ अनुभव असलेल्या र}ा रघुवंशी असल्याने शहराचा सर्वागिन विकास होईल आणि विकासाची गती कायम राहील. सत्ताधारी आणि विरोधक हा भेद राहणार नाही, विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून योजना आणि विकास कामांना खिळ बसविणार नाही अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.पालिकेच्या निवडणुकीचे कवित्त्व आता संपल्यासारखे आहे. परंतु आता येत्या पाच वर्षात शहर विकासाचे व्हिजन कायम ठेवून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे देखील तेवढेच गरजेचे ठरणार आहे. यापूर्वी शहर विकासाची गाडी सुपरफास्ट धावली आहे. निवडणुकांमुळे ती सध्या थांबली असली तरी सत्ताधारींकडेच जनतेने पुन्हा पालिका सोपविली असल्यामुळे ही सुपरफास्ट पुन्हा धावू लागेल यात शंका नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच कामांचे नियोजन करून ठेवले असले तरी नव्याने आलेल्या सदस्यांची मर्जी सांभाळणे आणि त्यांच्या कामांच्या, विकासाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी देखील प्रय} करावे लागणार आहेत.पालिकेत निवडून आलेल्या 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने अर्थात पहिल्यांदाच पालिकेचे सदस्य म्हणून येणार आहेत. याआधी नगरसेवक असलेल्या पाच सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, किरण रघुवंशी, दिपक दिघे आणि चारुदत्त कळवणकर यांचा समावेश आहे. नवीन निवडून आलेल्या सदस्यांना पालिकेचे कामकाज, सभागृहाचे कामकाज आणि आपल्या प्रभागातील प्रश्न, समस्या आणि नागरिकांची मागणी यादृष्टीने त्यांना अवगत करून देणे आवश्यक ठरणार आहे. 39 सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या तब्बल 22 इतकी आहे. त्यातील केवळ एकच महिला माजी नगरसेवकाच्या प}ी आहेत. पालिकेत यावेळी विरोधातील 11 नगरसेवक देखील राहणार आहेत. यापूर्वी पालिकेने विकास करतांना सत्ताधारी व विरोधक हा भेद ठेवला नव्हता. सर्वसमावेशक विकास हे ध्येय समोर ठेवले होते. आता देखील तेच ध्येय ठेवणे आवश्यक ठरणार आहे. विरोधकांकडून काही कामांना, योजना, निधी यांना विरोध होऊ शकतो. लोकशाहीत ही बाब सर्वसामान्य समजली जाते. त्यामुळे विरोध केला म्हणून संबधिताच्या प्रभागात काम न करणे ही मानसिकता असू नये विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून कामांमध्ये आडकाठी आणून शहर विकासाच्या योजनांना खिळ घालू नये ही देखील अपेक्षा जनतेची राहणार आहे.शहराचा विकासाचा वेग पहाता आणि झालेली कामे पहाता शहरवासीयांनी काँग्रेसवर पुन्हा विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे झालेल्या विकास कामांच्या बळावर आणि होऊ घातलेल्या कामांच्या बळावर शहराला राज्यातील पहिल्या दहा विकसीत आणि स्मार्ट शहरांच्या रांगेत आणण्याचे ध्येय काँग्रेसला ठेवावे लागणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. शासनाकडून विविध योनजेच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची कला आहे. शासनातील मंत्री, अधिकारी यांच्याशी वैयक्तिक संबधाच्या माध्यमातून ते योजना मंजुर करून आणून कामेही करून घेतात. त्यामुळे ‘पहिल्या दहा शहरात’ हे ध्येय पुर्ण करणे फारसे कठीण राहणार नाही. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन करून त्यानुसार कामांची आखणी केल्यास ते शक्य होणार आहे.एकुणच शहरवासीयांनी सलग चौथ्यांदा काँग्रेसवर पर्यायाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे शहराचा सर्वागीन विकासाचे ध्येय तर त्यांनी ठेवले आहेच, परंतु विकास कामांची गती कायम राखणे देखील तेवढेचे गरजेचे ठरणार आहे.