शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

रुग्ण संख्येत नंदुरबार तालुका टॉपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन महिन्यात जिल्ह्यात केवळ दोन हजार स्वॅब घेतले गेले. आता पुढील आठवड्यापासून स्वॅबची संख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तीन महिन्यात जिल्ह्यात केवळ दोन हजार स्वॅब घेतले गेले. आता पुढील आठवड्यापासून स्वॅबची संख्या वाढणार असून स्थानिक ठिकाणीच ते तपासले जाणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत नंदुरबार जिल्हा आजही टॉपवर आहे. शहादा दुसऱ्या स्थानी तर तळोदा तिसºया स्थानावर आहे. धडगावमध्ये सुदैवाने अजूनही खाते उघडले गेले नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८० रुग्ण आढळून आले असून ८३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ४ जुलैपर्यंत तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीत केवळ दोन हजार स्वॅबची तपासणी केली गेली. याला वेगवेगळे कारणे असले तरी आता स्थानिक ठिकाणीच स्वॅब तपासणी व्हावी यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे स्वॅब घेणे आणि तपासणी करणे याची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे संक्रमणाचा धोका देखील कमी होण्यास मदत होणार आहे.नंदुरबार टॉपवरचजिल्ह्यात नंदुरबार शहर व तालुका टॉपर आहे. तब्बल १२० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाच जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे. सद्य स्थितीत शहर व तालुक्यातील ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ५४ जण बरे झाल्याने घरी जाऊ देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वाधिक जवळपास १२५९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.अखेर नवापुरात पॉझिटिव्ह...नवापूर शहर व तालुका गुजरात राज्याच्या सिमेवर असतांना, महामार्ग गेलेला असतांना देखील तालुक्यात कोरोनाने एक अपवाद वगळता शिरकाव केलेला नव्हता. विसरवाडी येथे आढळलेला एक रुग्ण वगळता नवापूर तालुका निल होता. परंतु बाहेरून आलेल्या रुग्णामुळे नवापुरात कोरोनाने शिरकाव केलाच. शुक्रवारी शहरात एक रुग्ण आढळून आला. ही रुग्ण महिला सुरत येथून आलेली असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात आता सद्य स्थितीत एकच रुग्ण असला तरी ७१ पेक्षा अधीक जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत.एकमेव धडगाव तालुका सुरक्षीतधडगाव हा एकमेव तालुका कोरोनापासून अलिप्त राहिला आहे. तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही.तालुक्यातील ३६ जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्यातील सर्वच स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. यापुढेही तालुका कोरोनामुक्त राहावा यासाठी प्रयत्न सुरू असून तालुका प्रशासन प्रयत्नशील आहेत.मोलगी भागात प्रादुर्भावअक्कलकुवा तालुक्यातील मोलगी सारख्या दुर्गम भागात देखील कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. परंतु बाहेरून आलेल्या व्यापाºयाने येथे सुरुवात केली. त्यानंतर बाहेरून येणाºया पोलीस कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली. त्यामुळे मोलगीत एक दोन नव्हते तर सहा कोरोनाबाधीत आढळून आले. सुदैवाने दुर्गम भागातील सामान्य जनतेत त्याचे संक्रमण न झाल्याने मोठा दिलासा मिळाला. परंतु यापुढे देखील बाहेरून आलेल्यांमुळे संक्रमन वाढू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.याउलट अक्कलकुवा शहरात सुरुवातीला आढळलेल्या चार रुग्णा व्यतिरिक्त दुसरे रुग्ण आढळून आलेले नाहीत.शहादा-तळोदा वरचडनंदुरबारच्या खालोखाल तळोदा व शहादा तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. तळोद्यात १७ तर शहादा तालुक्यातदेखील २८ रुग्ण आढळून आलेले आहेत. तळोद्यातील ९ रुग्ण बरे झाले असून सहा जण उपचार घेत आहेत. तर शहाद्यात १४ रुग्ण बरे झाले असून ११ जण उपचार घेत आहेत.२०७० स्वॅब घेतलेजिल्ह्यात आतापर्यंत एकुण २,०७० स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात १,२५९, शहादा तालुक्यात ३४५, तळोदा तालुक्यात १३४, नवापूर तालुक्यात ७१, अक्कलकुवा तालुक्यात ३२४, धडगाव तालुक्यात ३६ स्वॅब घेण्यात आले. या स्वॅब रिपोर्टपैकी आता १२० रिपोर्टची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असल्यामुळे रुग्ण संख्येचे प्रमाण देखील कमी असल्याचे एकुण चित्र आहे.पुढील आठवड्यापासून स्थानिक स्तरावरच स्वॅब तपासणी केली जाणार असल्यामुळे स्वॅब घेण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे.सद्य स्थितीत जिल्हाबाहेरून येणाºया लोकांमुळेच कोरोनाचा फैलाव होत असल्याचे नंदुरबार, शहादा, तळोदा येथील प्रकारांवरून दिसून येत आहे.