लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातून पाठविण्यात येणाऱ्या स्वॅबचे अहवाल प्रलंबीत राहत आहेत. धुळे लॅबवर जळगाव, धुळे व मालेगाव येथील स्वॅब तपासणीचा ताण असल्यामुळे नंदुरबारला वेटींगवर ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी एकही स्वॅब पाठविण्यात आला नव्हता. बुधवारी १३ स्वॅब पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, सिव्हीलतर्फे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दुसºया व तिसºया साखळीतील लोकांचे अहवाल मोठ्या प्रमाणावर पाठविले जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. गेल्या आठवड्यात आष्टे व नंदुरबार येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या संपर्कातील अनेकांचे स्वॅब घेण्यात आले होते. परंतु अशा रुग्णांच्या संपर्कातील दुसºया व तिसºया साखळीतील लोकांचे स्वॅब मोठ्या प्रमाणावर घेतले गेले. त्यामुळे स्वॅब नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. परिणामी त्यांचे अहवाल येणेही थांबले. सद्य स्थितीत १११ अहवाल प्रलंबीत असल्याचे स्पष्ट आहे.पॉझिटिव्ह रुग्णांचेही...शहादा शहरातील व अक्कलकुवा व नंदुरबार तालुक्यातील एक रुग्णाचे दुसरे व तिसरे अहवाल येण्याचे बाकी आहेत. त्यांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. गेल्या २० दिवसांपासून हे रुग्ण आयशोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांची प्रकृती देखील चांगली झाली आहे. परंतु दुसरे व तिसरे स्वॅबचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना आयशोलेशन वॉर्डमधून डिस्चार्ज मिळणे मुश्किल आहे.धुळे लॅबवर ताण...नंदुरबार, जळगाव व मालेगावसह धुळे जिल्ह्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी धुळे येथील लॅबमध्ये पाठविले जातात. सध्या जळगाव, मालेगाव आणि धुळे जिल्ह्यात कोरोना ुरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आणि त्यांच्या दुसºया व तिसºया साखळीतील लोकांचे स्वॅब घेण्याचे प्रमाण अधीक आहे. परिणामी एकाच वेळी या जिल्ह्यातील किमान १०० ते २०० स्वॅब नमुने तपासणीसाठी धुळे प्रयोगशाळेत येत आहेत. परिणामी या लॅबवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्या तुलनेत नंदुरबारची संख्या स्थिर असल्याने नंदुरबारच्या स्वॅब नमुन्यांना वेटींगवर ठेवले जात आहे. दोन दिवस अर्थात सोमवार व मंगळवारी तर एकही स्वॅब धुळे प्रयोगशाळेने घेतला नसल्याचे चित्र होते. बुधवारी १३ स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. सद्य स्थितीत जिल्ह्यातील १११ नमुन्यांचा अहवाल आता प्रलंबीत आहे. यात पॉझिटिव्ह असलेले व आयशोलेशन वॉर्डमध्ये १४ ते २० दिवस उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या स्वॅबचाही समावेश आहे.अनेकजण स्वत:हून...जिल्हा रुग्णालयात अनेकजण स्वत:हून स्वॅब देण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. साधी सर्दी, खोकला व ताप असलेलेही काहीजण घाबरून स्वत: स्वॅब देवून जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी साधी सर्दी, खोकला असल्यास प्राथमिक उपचार करून घेण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहेच.
धुळे येथील लॅबमध्ये इतर जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची प्रलंबीत संख्या पहाता दोन दिवस जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेतले गेले नव्हते. बुधवारी मात्र १३ नमुने पाठविण्यात आले आहेत. ते धुळे लॅबने घेतले आहेत. सध्या जिल्ह्यातील १११ नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली. या सर्व नमुन्यांचा अहवाल गुरुवारी दुपारी किंवा सायंकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चित्र अधीक स्पष्ट होईल असे डॉ.भोये यांनंी सांगितले.