शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात बेघरांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:16 IST

नंदुरबार : शहरी बेघरांसाठी पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केली असून त्यांची देखभाल व सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय ...

नंदुरबार : शहरी बेघरांसाठी पालिकेने तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केली असून त्यांची देखभाल व सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ अजेंड्यावरील ११ विषयांसह आयत्या वेळच्या तीन विषयांना मंजूरी देण्यात आली़ अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान हे होते़गुरुवारी सकाळी पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी बहुउद्देशीय सभागृहात ही सभा घेण्यात आली़ पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गणेश गिरी होते़ प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले़ यानंतर रुखमाबाई नगरातील सर्वे क्रमांक ३५१/२ येथे एचडीपीई पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी ५ लाख ८२ हजार ३२३ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, २०१९-२० या वर्षासाठी पालिकेच्या स्मशान भूमीसाठी लागणारे जळाऊ लाकूड खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये खर्च, जी़टी़पाटील महाविद्यालय परिसरातील भिलाटीजवळ व्यायाम शाळा बांधकाम तसेच रस्ते व गटार कामाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, २०१९-२० या वर्षाकरिता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील इलेक्ट्रीक मोटारी, सबमर्सिबल पंप रिवार्इंडींग करणे, दुरुस्ती करणे दर मागवणे व यासाठी येणाºया खर्चास मंजूरी देणे, पालिकेतर्फे चालवल्या जाणाºया दिनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षाकरिता तात्पुरत्या निवाºयामध्ये राहणाºया शहरी बेघरांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी नवीन संस्थेला काम देण्यासाठी अभिकर्त्याची नियुक्ती करणे, शहरातील सर्वे क्रमांक ५६७ या पालिकेच्या मालकीच्या दवाखाना व सुतिकागृहाजवळील खुल्या जागेला कुंपण करुन भिंतीचे बांधकाम करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, सर्वे क्रमांक १३३/१ व १४३/१/२/३ येथील घनकचरा व्यवस्थापनेच्या प्रकल्प (भाग १ व २) जागेचे कंपाउंड बांधकाम करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, रॉयल पार्क मधील अंतर्गत रस्ते खडीकरण करणाºया ठेकेदारास मुदतवाढ देणे, इमाम बादशाह दर्ग्याच्या पहिल्या कमानीपासून पश्चिमेस कब्रस्तानमधून इदगाह कमान बिलाडी रस्त्यापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामासाठी ६५ लाख ६२ हजार ७८६ रुपयांच्या खर्चास मंजूरी देणे, रज्जाक पार्कमध्ये नाला बांधकामाची लांबी वाढवण्यासह इतर तीन विषय मंजूर करण्यात आले़सभेत सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना तसेच विरोधी गटातील भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते़ २० मिनीटात संपूर्ण सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आले़