लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीसीटीएनएस प्रणालीचा सर्वाधिक वापर करीत 135 गुण मिळविणारे नंदुरबार पोलीस दल राज्यात अव्वल ठरले आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन पोलीस ठाण्यात दाखल होणा:या गुन्ह्याची प्रथम खबर अहवाल ते न्यायालयीन निकालार्पयत सर्व कागदपत्रे सीसीटीएनएस संगणकीय प्रणालीत फिड करुन डॉक्युमेंटेशन केल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दल राज्यात अव्वल ठरले आह़े सर्व 12 पोलीस ठाणे ऑनलाईन करुन कामकाज केल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा राज्यात गौरव होतो आह़े राज्य पोलीस दलामार्फत क्राईम अॅण्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टीम अर्थात सीसीटीएनएस ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील सर्व 12 पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर 2015 पासून कामकाज सुरु करण्यात आल्या होत़े यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्याची प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, जप्ती पंचनामा, दोषारोपपत्र, न्यायालयीन निकाल अशी विविध कागदपत्रे सीसीटीएनएस प्रणालीत फिड करण्यात येत होती़ पोलीस अधिकारी व कर्मचा:यांनी यासाठी परिश्रम घेतले होत़े सीसीटीएनएस प्रणाली कामगिरीचा आढावा पोलीस महासंचालक यांनी घेतल्यानंतर नंदुरबार जिल्हा राज्यात प्रथम आला आह़े जिल्हा पोलीस दलाला सर्वाधिक 135 गुण देण्यात आले आहेत़ पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी पोलीस अधिकारी व कर्मचा:यांचा गौरव केला आह़े
सीसीटीएनएस प्रणालीत राज्यात नंदुरबार पोलीस अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 13:55 IST