शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरळ लढतींमुळे रंगत वाढणार : नंदुरबार पालिका निवडणूक

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: December 3, 2017 13:10 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब्बल 17 प्रभागांमध्ये सरळ लढती राहणार आहेत. 15 प्रभागात तिरंगी  तर सात प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब्बल 17 प्रभागांमध्ये सरळ लढती राहणार आहेत. 15 प्रभागात तिरंगी  तर सात प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. माघारी व चिन्ह वाटपानंतर आता प्रचाराला वेग आला आहे. नंदुरबारातील पालिका निवडणूक ही काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ होईल अशी शक्यता पुर्वीपासूनच राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त होत होती. घडामोडी देखील तशाच रंगल्या होत्या. माघारीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला असला तरी प्रभागात पक्षाला उमेदवारांची चणचण भासली. एमआयएमने देखील नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देवून काही प्रभागात उमेदवार उभे केले. त्यामुळे 90 टक्के प्रभागात काँग्रेस-सेना युती आणि भाजप यांच्यातच सरळ लढती रंगणार आहेत.17 प्रभागात दोघेच आमनेसामनेकाँग्रेस व भाजपचे दोघेच उमेदवार आमनेसामने राहण्याची स्थिती 17 प्रभागांमध्ये आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये काटय़ाची टक्कर राहणार आहे. कारण मतविभागणीसाठी तिसरा उमेदवार नसल्यामुळे ही स्थिती राहणार आहे. अशा लढती प्रभाग 1 ब, 2 अ, 2 ब, 4 अ, 5 अ, 5 ब, 6 अ, 7 ब, 8 अ, 9 अ, 10 अ, 10 ब, 11 अ, 16 अ, 18 ब, 19 अ व 19 ब मध्ये राहणार आहेत. या प्रभागांमध्ये अनेक लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.15 ठिकाणी तिरंगी लढती15 प्रभागांमध्ये तिरंगी लढती रंगणार आहेत. या प्रभागातील काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसमोर काही ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम व राष्ट्रवादीचे उमेदवार तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मते फोडण्याचे प्रकार होण्यासाठी देखील काहींना उभे केले आहे. अशा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 1 अ, 3 अ, 3 ब, 4 ब, 6 ब, 7 अ, 9 ब, 12 अ, 13 अ, 14 अ, 14 ब, 15 अ, 17 अ, 18 अ व 19 क या प्रभागांचा समावेश आहे. सर्वाधिक उमेदवारयंदा केवळ दोनच प्रभागात पाच पेक्षा अधीक उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये तब्बल आठ उमेदवार तर प्रभाग 13 ब मध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या पंचवार्षिकचा विचार केला असता तब्बल आठ प्रभागात सात पेक्षा अधीक उमेदवार होते. यंदा ही संख्या अवघी दोनवर आली आहे. हौशी मंडळी बाहेरचयंदा अनेक हौशी मंडळी इच्छा असूनही निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेरच राहिली. काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडे अनेक इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. परंतु दोन्ही पक्षांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा विचार करून तसेच जात, उमेदवाराचे समाजातील वलय, त्याने केलेले काम हे पाहूनच उमेदवारी दिली गेली. परिणामी उमेदवारी नाकारलेल्या अनेकांनी अपक्ष उभे न राहता निवडणूक रिंगणाच्या    बाहेरच राहणे पसंत केलेले दिसून येत आहे.