नंदुरबार : नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ३३ मागण्या मान्य न झाल्यास सफाई कामगार कामबंद आंदोलन करतील. २० रोजीच्या बैठकीत अंतिम रुपरेशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती सफाई कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आली.नंदुरबार नगर परिषदेतील सफाई कामगारांनी आपल्या विविध ३३ मागण्यांसाठी शासन आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न करणारे नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचे ठरविले होते. मात्र जिल्हाधिकारी आणि नंदुरबार नगरपालिका अधिकारी, कर्मचाºयांनी सदर उपोषण मागे घेण्यासाठी तोंडी आश्वासने दिली होती. तुमच्या सर्व मागण्यांची पुर्तता करु, असे आतापर्यंत तीनवेळा सांगण्यात आले आहे. त्यांच्या विनंतीला आणि शासनावर येणाºया जबाबदारीचा विषय लक्षात घेऊन सदर आमरण उपोषण काही काळापुरते स्थगित करण्याचे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कुंदन थनवार यांनी मान्य करुन सदर उपोषण स्थगित केले होते.नंदुरबार नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या मागण्यांविषयी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना गेल्या तीन वषार्पासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. संघटनेचे पदाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक नगर पालिका प्रशासकीय अधिकारी यांनी २० फेब्रुवारी रोजी बोलाविली आहे. या बैठकीत सफाई कामगारांना देय पेन्शन, ग्रॅज्युईटी फंड, महागाई भत्ता, मेडीकल बिल आदींसह ३३ मागण्यांवर चर्चा करुन निर्णय होणार आहे. तसे न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नंदुरबार पालिकेचे सफाई कर्मचारी उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:29 IST