शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा देण्याच्या बहाण्याने नंदुरबारात डॉक्टरला पाच लाखात गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:18 IST

पाच जणांना अटक : विसरवाडी गावातील प्रकार

नंदुरबार : सहा लाख रुपये दिल्यास १५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा देण्याचे अमिष दाखवत निफाड येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले़ मंगळवारी रात्री विसरवाडी येथे हा बनाव उघड झाल्यानंतर संबधित डॉक्टरने थेट पोलीस ठाणे गाठले़निफाड येथील डॉ़ विकास निवृत्ती चांदर यांच्या ओळखीतील एकाने सहा लाख रुपये दिल्यानंतर चलनातील खºया नोटांप्रमाणेच हुबेहुब दिसणाºया नोटा मिळत असल्याची माहिती दिली होती़ यानुसार डॉ़ चांदर यांना राजेंद्र संपत ढोमसे रा़ मालपूर ता़ साक्री याने संपर्क करुन सहा लाख रुपये दिल्यावर १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळतील असे सांगितले होते़ दोघांमध्ये सौदा पक्का झाला झाल्यानंतर विसरवाडी बसस्टँडजवळ पेट्रोलपंप परिसरात मंगळवारी रात्री नोटा देण्याचे ठरले होते़ त्यानुसार डॉ़ चांदर हे मित्रासोबत निफाड येथून मंगळवारी रात्री विसरवाडी येथे आले होते़ यावेळी घटनास्थळी राजेंद्र ढोमसे याच्यासह अशोक धोंडू मोरे, गौरव दिलीप अहिरराव, केतन भास्कर मोरे, राजेंद्र नवल मालचे सर्व रा़ धाडणे ता़ साक्री हे हजर होते़ डॉ़ चांदर यांच्याकडून पाच लाख रुपये ताब्यात घेतल्यानंतर पाचही जणांनी पोलीस आल्याचा बनाव करत पळापळी सुरु केली़ याची शंका आल्यानंतर डॉ़ विकास चांदर यांनी तातडीने विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रकाराची माहिती दिली़ पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर पाचही संशयित पसार होण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले़ याबाबत बुधवारी पहाटे डॉ़ चांदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र ढोमसे, अशोक मोरे, गौरव अहिरराव, केतन मोरे, जितेंद्र मालचे यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत़