शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

नंदुरबारला विकसनशील आणि समस्यामुक्त शहर करणारच : नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासाठी जे जे शक्य असेल ते ते विकासाचे आणि सेवेची कामे करण्याचा आपला प्रयत्न राहील. गेल्या 15 वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. आता लोकनियुक्त नगराध्यक्षा असल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यातील पहिल्या दहा शहरात नंदुरबार आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लोकमत संवाद कार्यक्रमात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासाठी जे जे शक्य असेल ते ते विकासाचे आणि सेवेची कामे करण्याचा आपला प्रयत्न राहील. गेल्या 15 वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. आता लोकनियुक्त नगराध्यक्षा असल्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यातील पहिल्या दहा शहरात नंदुरबार आणण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लोकमत संवाद कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बुधवारी ह्यलोकमतह्ण कार्यालयास भेट दिली. ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. शहराच्या विकासाच्या योजना आणि झालेल्या कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडतांना सांगितले, पहिल्यांदा अर्थात 2001 साली आपण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. या शहराची लेक आणि सून असल्यामुळे शहरवासीयांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला. त्या विश्वाला तडा न जाऊ देता आपण पाच वर्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने विकासाची कामे केली. त्याकाळी झालेली कामे ही सर्वाधिक कामे म्हणून गणली गेली. त्यानंतरच्या निवडणुकीतही मला नगरसेवक म्हणून निवडून दिले. नंतर नगराध्यक्षा म्हणून पुन्हा संधी मिळाली. गेल्या पंचवार्षीकला देखील पुर्ण पाच वर्ष नगराध्यक्षा म्हणून राहण्याची संधी मिळाली. या 15 वर्षाच्या कालखंडात शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. एक विकसीत शहर म्हणून नावारुपास आणले.यंदाच्या पालिका निवडणुकीत देखील थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून मला मोठय़ा मताधिक्याने निवडून देत पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. नंदुरबारात सर्व विकासाची कामे केली गेली आहे. काही राहिलेली कामे आता पुर्ण करण्यात येणार आहे. नंदुरबारात काय नाही असे आता विचारले जाते. निवडणुकीत जनतेला 24 तास पाणी पुरवठा करण्याचे सांगितले होते. त्यावर काम सुरू झाले आहे. वर्धा येथील संस्थेला सव्र्हेक्षणाचे काम देण्यात आले आहे. शहराच्या 2040 सालची लोकसंख्या गृहित धरून पाणी पुरवठय़ाचे नियोजन केलेले आहे. शिवाय गुरूत्वाकर्षणामुळे जादा पंपींगची गरज लागत नाही. ही बाब लक्षात घेता शहरात 24 तास पाणी पुरवठय़ाची योजना यशस्वी होईल यात शंका नाही. त्यासाठी मिटर पद्धत अवलंबवावी लागेल. त्यातही जनतेचाच फायदा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आताच्या घडीला खान्देशातील सर्वात कमी पाणीपट्टी आकारणारी नंदुरबार पालिका आहे. विस्तारीत पाणी पुरवठा योजना शासनाने मंजुर केली तेंव्हा पाच वर्षात टप्प्याटप्याने पाणी पट्टी वाढविण्याचे निर्देश होते. परंतु जनतेच्या हिताकरीता ते वाढविले नाहीत.पालिकेची अद्ययावत इमारत आज उभी राहिली असती. परंतु केवळ विरोधाला विरोध म्हणून ते काम रखडविण्यात आले. आता जुन्या न्यायालयाच्या जागेची अडचण लवकरच सुटून पालिकेची इमारत आकारास येईल असा विश्वास रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केला.रस्ते प्रकल्प मार्गी लागला आहे. काही ठिकाणी रस्त्यांची तुरळक कामे अपुर्ण आहेत ती पुर्ण करण्यात येतील. स्वच्छतेबाबत देखील राज्यातील मोजक्या शहरांमध्ये नंदुरबार शहर आले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच कार्यान्वीत होणार आहे. जल-मल:निसारण केंद्र देखील सुरू झाले आहे. शहराला आधीच हगणदारीमुक्त गाव घोषीत करण्यात आलेले आहे. जनतेच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.खान्देशातील किंबहुना राज्यातील माँ-बेटी गार्डन देखील नंदुरबार पालिका आकारास आणत आहे. वळण रस्त्यावरील पालिकेच्या सर्वात मोठय़ा खुल्या जागेत हे गार्डन उभारण्यात येणार आहे. या गार्डनमध्ये भारतातील कतूरूत्ववान व आजची पिढीला आदर्शवत राहतील अशा महिलांचे पुतळे व अर्थात शिल्प या ठिकाणी बसवले जाणार आहे.पालिकेने केवळ नागरी सुविधा पुरविणे एवढेच ध्येय ठेवले नाही तर या शहरातील नागरिकांच्या हितासाठी जे जे शक्य असेल ते देण्याचा आणि करण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यात नागरिकांचा आरोग्याकडेही लक्ष दिले आहे. अवघ्या 200 रुपयात डायलेसीसची सोय आहे. 200 रुपयातच सोनोग्राफी, 70 रुपयात एक्सरे काढला जातो. रक्त तपासणी अवघ्या 20 रुपयात केली जाते. लवकरच राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाअंतर्गत दोन दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. बांधकाम पुर्ण झाले असून केवळ अधिकारी, कर्मचा:यांची भरती तेवढी बाकी आहे. येत्या 15 दिवसात ते देखील पुर्ण होऊन हे दोन्ही दवाखाने सुरू करण्याचा मानस आहे. शिवाय पालिकेचेच 20 खाटांचे रुग्णालय सुरू करून ते जीवनदायी योजनेत समाविष्ट करून सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा आपला प्रयत्न त्यातून राहणार आहे.विद्याथ्र्यासाठी ई-लायब्रररी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी बारावीच्या विद्याथ्र्यासाठी एमएचसीईटी चे वर्ग विनामुल्य आयोजित करण्यात येतात. महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करून स्वयंरोजगारासाठी साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नंदनगरीवासीयांचा विश्वासाच्या बळावर शहराला आणखी पुढे नेण्यासाठी आपला प्रयत्न आहे. येत्या पाच वर्षात शहराचे रुप आणखी बदललेले दिसेल असा विश्वासही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केला.