शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

स्ट्रॉबेरीच्या गोडव्याने मिळाला नंदुरबारला ‘निधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

नंदुरबार - सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादित होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले आहे. ...

नंदुरबार - सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादित होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले आहे. नव्हे तर स्ट्रॉबेरीची चव चाखतच नंदुरबार जिल्ह्याला विकास आराखड्यासाठी ६० कोटींचा वाढीव निधीही मंजूर केला. तसेच स्ट्रॉबेरीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना देण्याचेही आश्वासन दिले. नाशिक येथे बुधवारी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागातील नियोजन समित्यांची बैठक घेण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यात सद्या सातपुड्यातील स्ट्रॉबेरी चांगली बहरली असून, उत्पादनही सुरू झाले आहे. सातपुड्यातील सुमारे ३० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही लागवड सुरू असली तरी सुरुवातीला अल्प प्रमाणात होती. यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. डाब आणि तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी या स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून, उत्पादन आणि उत्पादित मालाचा दर्जाही आता सुधारला आहे. हीच संधी साधत सातपुड्यातील स्ट्रॉबेरीला राज्यस्तरावर न्याय मिळावा यासाठी बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नाशिक येथे उपमुख्यमंत्र्यांना सातपुड्यातील स्ट्रॉबेरीची भेट देऊन त्याची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्ट्रॉबेरीच चव चाखून या स्ट्रॉबेरीचे कौतुक केले. त्या गोडव्यातूनच नंदुरबार जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या निधीत ६० कोटी ४३ लाख रुपयांची वाढ केली. पूर्वी राज्य समितीकडे शिफारस करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने सर्व साधारण योजनेसाठी ६९ कोटी ५७ लाखांचा आराखडा मंजुरीला दिला होता. तो आता १३० कोटी रुपयांचा करण्यात आला आहे. या आराखड्याव्यतिरिक्त स्ट्राॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ताेरणमाळ पर्यटन विकासासाठी निधी देण्याचेही आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयार केला आहे. हा आराखडा आता मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्या अंतर्गत स्ट्रॉबेरी शेती विकासाच्याही योजना समाविष्ट करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नंदुरबारला येताच जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी सातपुड्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.