शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात यंदा सर्वच गावे दुष्काळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अंतिम पैसेवारीत देखील एकही गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर न झाल्यामुळे जिल्ह्यातील एकाही गावाला दुष्काळी गावाचा लाभ मिळणार नसल्याची स्थिती आहे. नजर आणि सुधारीत पैसेवारी जाहीर झाल्यावर शेतक:यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतरही अंतिम पैसेवारीत कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अंतिम पैसेवारीत देखील एकही गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर न झाल्यामुळे जिल्ह्यातील एकाही गावाला दुष्काळी गावाचा लाभ मिळणार नसल्याची स्थिती आहे. नजर आणि सुधारीत पैसेवारी जाहीर झाल्यावर शेतक:यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतरही अंतिम पैसेवारीत कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 90 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी असली तरी पडलेला पाऊस हा अनियमित आणि सर्वत्र सारखाच पडलेला नाही. त्यामुळे  अनेक गावातील पीक स्थिती आणि एकसारखी नाही. त्यामुळे पीक पैसेवारी जाहीर करतांना त्याचा संदर्भ असू द्यावा आणि योग्य पद्धतीने पैसेवारी जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतु सरसकट सर्वच गावांना 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने जिल्ह्यात एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.पीक परिस्थितीही जेमतेमजिल्ह्यात खरीप पीक परिस्थितीही जेमतेमच राहिली. उत्पादकता 15 ते 20 टक्यांनी घटल्याचा अंदाज आहे. शिवाय परतीच्या पावसाने देखील मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले होते. त्यामुळे शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला होता. कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव व बोंडअळीने समस्या निर्माण केली होती. सोयाबीनने देखील अपेक्षीत उत्पन्न दिलेले नाही. त्यामुळे खरीप हंगामाबाबत शेतक:यांची घोर निराशाच झाली.नजर व सुधारीत पैसेवारीजिल्हा प्रशासनाने नजर व त्यानंतर सुधारीत पैसेवारी जाहीर करतांना सरसकट सर्वच खरीप गावांमधील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधीक जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी शहादा, नवापूर तालुक्यातील शेतक:यांनी प्रशासनाला निवेदन देवून पैसेवारीबाबत नाराजी व्यक्त करून 50 पैशांच्या आत जाहीर करावी अशी मागणी केली होती. परंतु सुधारीतही नाही आणि अंतिम पैसेवारी जाहीर करतांना देखील त्याचा विचार करण्यात आला नाही. सरसकट संपुर्ण जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधीक जाहीर करण्यात आली     आहे.दुष्काळी योजनांचा फायदा नाहीयामुळे जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी म्हणून जाहीर होणार नाही. परिणामी शासनाच्या दुष्काळी गावांसाठीच्या असलेल्या योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. वास्तविक नवापूर व शहादा तालुक्यातील 20 ते 30 गावे, नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील 15 ते 20 गावांमधील पीक आणि पाण्याची स्थिती वाईट आहे. या गावांबाबत तरी प्रशासनाने वेगळा विचार करणे आवश्यक असतांना मात्र तसा कोणताही निर्णय घेतला गेला नाही.