शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

नंदुरबार जिल्ह्यात नवीन 100 ग्रंथालये सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:31 IST

हिना गावीत यांचा संकल्प : ग्रंथोत्सवाचे उद्घाटन, ग्रंथदिंडीसह विविध उपक्रम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 :  जिल्ह्यात नवीन 100 वाचनालये सुरू करून त्यासाठी खासदार निधीतून रक्कम उपलब्ध करून देण्याचा संकल्प खासदार डॉ.हिना गावीत यांनी केला. जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे तीन दिवशीय ग्रंथोत्सवास सोमवारी सुरुवात झाली. उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.पीतांबर सरोदे, जि.प.सभापती दत्तू चौरे, आत्माराम बागले, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, अनिकेत पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, यशवंत पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पटेल आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या, सध्या वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. जिल्ह्यात 124 ग्रंथालये आहेत. जिल्ह्यात अजून ग्रंथालयांची संख्या वाढावी यासाठी नव्याने 100 वाचनालये सुरू करून त्यासाठी लागणा:या पुस्तकांसाठी खासदार निधीतून रक्कम उपलब्ध करून देण्याचा संकल्प आज आपण जाहीर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, सध्या मोबाईलचे युग आहे. त्यामुळे मुले पुस्तके वाचण्यापेक्षा मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवतात. यासाठी शाळांमध्ये शाररिक शिक्षणासारखा पुस्तक वाचनासाठी देखील एखादा तास ठेवावा. शिवाय शालेय ग्रंथालये सुसज्ज ठेवून त्यात विद्याथ्र्याना सहज वावरता येईल यासाठीची सोय करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विद्याथ्र्याना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी पालकांनीही त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तके उपलब्ध करून द्यावी. सध्या ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे पुस्तके विकत घेवून वाचण्याचीही गरज राहिली नाही. मोबाईल, संगणकावर इंटरनेटद्वारा हवी ती पुस्तके सहज उपलब्ध होत असतात. त्याचाही उपयोग करून घ्यावा असेही आवाहन खासदार डॉ.हिना गावीत यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले, विद्याथ्र्याना वाचनाची गोडी वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज आहे. कुठलाही शासकीय कार्यक्रम घेतांना स्वागत हे पुस्तक देवूनच झाले पाहिजे या मताचा मी आहे. शालेय ग्रंथालये सुसज्ज असली पाहिजे. शाळा जास्तीत जास्त तंबाखुमुक्त करण्यासाठी देखील या माध्यमातून प्रय} केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी पुस्तक जत्रेच्या स्टॉलचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्टॉलवर विविध विषयांवरील पुस्तके व ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन ललिता पाटील यांनी केले. आभार सुनील भामरे यांनी मानले. पहिल्या दिवशी दुपारून बालकवी संमलेन झाले. त्यात अनेक विद्याथ्र्यानी सहभाग घेतला. सायंकाळी छाया संगीत साधना विद्यालयाच्या सुनिता चव्हाण व  विद्यार्थीनींनी सुगम संगीत कार्यक्रम सादर केला.