शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कुष्ठरोग मुक्तीकडे नंदुरबार जिल्ह्याची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय कुष्ठरोग निमरुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑगस्टअखेर केवळ 268 कुष्ठरोगी आढळून आले आहेत़ गत दोन वर्षात निष्पन्न झालेल्या 504 कुष्ठरोगींवर उपचार केल्याने त्यातील 236 पूर्णपणे बरे झाले असून रोगमुक्तीच्या मार्गावर आहेत़ यामुळे येत्या वर्षात जिल्ह्याची कुष्ठरोगमुक्तीकडे वाटचाल सुरू आह़े सातत्याने होणारे उपचार आणि मार्गदर्शन यातून हे साध्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय कुष्ठरोग निमरुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑगस्टअखेर केवळ 268 कुष्ठरोगी आढळून आले आहेत़ गत दोन वर्षात निष्पन्न झालेल्या 504 कुष्ठरोगींवर उपचार केल्याने त्यातील 236 पूर्णपणे बरे झाले असून रोगमुक्तीच्या मार्गावर आहेत़ यामुळे येत्या वर्षात जिल्ह्याची कुष्ठरोगमुक्तीकडे वाटचाल सुरू आह़े सातत्याने होणारे उपचार आणि मार्गदर्शन यातून हे साध्य झाल्याची माहिती आह़ेजिल्ह्यात 2016 पासून कुष्ठरोग निमरुलन अभियानाला वेग आला आह़े यातून सर्व सहा तालुक्यात कुष्ठरोगींच्या शोधासाठी मोहिम राबवण्यात येऊन मार्गदर्शन आणि उपचार करण्यात येत आहेत़ आरोग्य विभागाच्या पथकांकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत 2016 मध्ये 5 हजार 755 तर 2017 मध्ये 5 हजार 364 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती़ यातून 2016 या वर्षात 282, 2017 मध्ये 30 तर 2018 मध्ये 24 रूग्ण आढळून आले होत़े या  रूग्णांवर विभागाकडून मार्गदर्शन आणि उपचार करण्यात येत होत़े यातून 236 रूग्ण पूर्णपणे बरे झाले असून उर्वरित 268 रूग्णही कुष्ठरोगमुक्त होण्याच्या मार्गावर आह़े कुष्ठरोगींच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आह़े या समितीत कुष्ठरोग सहायक संचालक यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आह़े समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी, कुष्ठरोग संघटना, समाज कल्याण विभाग यांच्यासह अधिकारी व कर्मचा:यांचा समावेश आह़े जिल्ह्यात कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रशासनाकडून येत्या 24 सप्टेंबरपासून मोहिमेला सुरूवात करण्यात येणार असून 9 ऑक्टोबर्पयत सुरू राहणा:या या मोहिमेत कुष्ठरोगींचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती आह़े कुष्ठरोगाबाबत ग्रामीण भागात असलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठीही या मोहिमेद्वारे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े जिल्ह्यात आजअखेरीस 268 कुष्ठरोगी आहेत़ यात नंदुरबार 64, नवापूर 46, तळोदा 41, शहादा 52, अक्कलकुवा 38 तर धडगाव तालुक्यात 27 रूग्ण आहेत़  5  ते 20 सप्टेंबर 2017 या काळात राबवल्या गेलेल्य कुष्ठोगी शोध मोहिमेत 282 रूग्ण आढळून आले होत़े अक्कलकुवा 27, धडगाव 13, नंदुरबार 79, नवापूर 35, शहादा 81 तर तळोदा तालुक्यात 47 रूग्ण आढळून आले होत़े यात 29 रूग्ण पूर्णपणे बरे करण्यात कुष्ठरोग विभागाला यश आले होत़े 19 ते 5 ऑक्टोबर 2016 या काळात 198 कुष्ठरोगी आढळून आले होत़े यात अक्कलकुवा 26, धडगाव 12, नंदुरबार 29, नवापूर 42, शहादा 51 तर तळोदा तालुक्यात 38 रूग्ण आढळून आले होत़े यातील 27 रुग्ण बरे झाले होत़े त्यातुलनेत चालू वर्षात 236 रूग्ण रोगमुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आह़े जिल्ह्यात कुष्ठरोग निमरुलन मोहिमेत प्रशासनासोबत काम करून कुष्ठरोगींवर उपचार आणि त्यांना मानसिक आधार देणा:या उत्कृष्ठ आशा स्वयंसेविकांचा नुकताच गौरव करण्यात आला़  यात चुलवड ता़ धडगाव आरोग्य केंद्रातील लता वनसिंग पराडके , चिंचपाडा ता़ नवापूर येथील संगीता संतोष धोडिया, प्रतापपूर ता़ तळोदा येथील उषा संजय ठाकरे, लहान शहादा ता़ नंदुरबार येथील जयश्री विलास शुक्ल, डाब ता़ अक्कलकुवा येथील पनुबाई धर्मा वळवी तर कुष्ठरोग कार्यालयाचे तंत्रज्ञ सुनंदा वळवी, आर एम पाटील, भटू वाढणे, संतोष माळी , एस़ जी़ अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत कलसाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी यांचाही गौरव करण्यात आला़ 24 पासून सुरू होणा:या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आह़े