शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

नंदुरबार जिल्ह्यात उज्‍जवला लाभार्थीची प्रतीक्षा पुन्हा वाढली

By admin | Updated: June 15, 2017 17:13 IST

प्रत्यक्षात वितरकांनी 22 हजारापेक्षा अधिक पात्र अर्जाचा भरणा गॅस कंपन्यांकडे केला आह़े

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 15 -  पंतप्रधान उज्‍जवला गॅस योजनेत समाविष्ट लाभार्थीची प्रतीक्षा पुन्हा वाढली आह़े वितरकांनी अर्ज भरून देऊनही जिल्ह्यात फक्त एक हजार कनेक्शन वाटप झाले आहेत़ प्रत्यक्षात वितरकांनी 22 हजारापेक्षा अधिक पात्र अर्जाचा भरणा  गॅस कंपन्यांकडे केला आह़े     जिल्ह्यात सुरू असलेली उज्‍जवला गॅस योजना एकापेक्षा अनेक कारणांनी गाजत आह़े या योजनेतील सहा वितरकांवर इंडियन ऑईल कंपनीने कारवाई केली आह़े काय, कारवाई झाली ही माहिती संबधितांनी दिली नसली, तरी सहा वितरकांना नोटीसा देऊन केवळ समज देण्यात आली आह़े या वितरकांकडून पैसे घेतले जात असल्याचे आरोप करण्यात आल्यानंतर खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दखल घेत, उज्‍जवला गॅस योजनेच्या राष्ट्रीय समन्वयकांना सूचित करून माहिती दिली होती़ यानंतरही मात्र कनेक्शन वाटपाला बसलेला खोडा कायम आह़े देशात दोन कोटी दारिद्रय़रेषेखालील महिलांना उज्‍जवला योजनेचा लाभ देण्यात आल्याचा दावा होत असला, तरी नंदुरबार जिल्ह्यात हा दावा पूर्णपणे फोल ठरत आह़े आतार्पयत जिल्ह्यात केवळ नवापूर, तळोदा आणि अक्कलकुवा यातीन तालुक्यात उज्‍जवलाचे कनेक्शन लाभार्थी महिलांना देण्यात आले आहेत़ नंदुरबार, शहादा आणि धडगाव येथील लाभार्थी महिलांना अजूनही गॅसची प्रतिक्षा आह़े नंदुरबार तालुक्यात एकही कनेक्शन देण्यात आलेली नसल्याची माहिती आह़े वितरकांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीनुसार केवायसी असलेल्या अर्जाचा भरणा करून घेतला आह़े या अर्जाचे आधार लिकिंग व ऑनलाईन भरणार करण्यात आला आह़े तरीही तीन तालुक्यात लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े राज्यातील सर्वात कमी गॅस कनेक्शन असलेल्या दुस:या क्रमांकाचा जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचा वेग वाढण्याची अपेक्षा होती़ मात्र वाटप करण्याच्या कामांमध्ये सुधारणा होण्याऐवजी किरकोळ वाटपही होऊ शकलेले नाही़  जिल्ह्यात दोन लाख 10 हजार 279 शिधापत्रिका दारिद्रय़रेषेखालील आहेत़ दारिद्रय़ रेषेखालील महिला लाभार्थीच्या या याद्या ग्रामस्तरावरून थेट गॅस वितरकांर्पयत 10 महिन्यांपूर्वी पोहोचवण्यात आल्या होत्या़ त्यानंतर बहुतांश ठिकाणी लाभार्थी महिलांनी तात्काळ अर्ज भरून देत कागदपत्रांची पूर्तता केली होती़ वेगात सुरूवात झालेल्या योजनेतून तात्काळ गॅस मिळेल या आशेने या महिला दररोज वितरकांचे उंबरठे ङिाजवत आहेत़ वितरकांकडे याचे ठोस असे उत्तर नसल्याने त्यांचाही नाईलाज आह़े विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेत जिल्ह्यातील साधारण पाच लाख दारिद्रय़रेषेखालील महिलांना आणून त्यांना गॅसचा लाभ देण्याची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली होती़