शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील मिरची उद्योग सापडला संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्याने मिरची उद्योगावरचे संकट अधिक गडद झाले आहेत़ जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार 800 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षापासून मंदीची मार सहन करत तग धरून असलेल्या मिरची उद्योगावरची संकटे दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या चिंता वाढल्या आहेत़ दरवर्षी किमान एक लाख क्विंटल होणारी आवक यंदा 15 टक्केही झालेली नसल्याने मिरची उद्योगावरचे संकट अधिक गडद झाले आहेत़ जिल्ह्यात दरवर्षी किमान एक हजार 800 हेक्टरवर मिरची लागवड होत़े नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यात उत्पादित केली जाणारी दिवाळीनंतर बाजारात येत़े यंदा नंदुरबार तालुक्यात 1 हजार 150 आणि शहादा तालुक्यात 600 हेक्टर मिरची लागवड झाली होती़ लागवडीत घट झाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली असून परिणामी नंदुरबार बाजार समितीत डिसेंबर महिना उजाडूनही केवळ 10 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आह़े आगामी महिनाभर हा हंगाम सुरू राहणार असला तरीही त्यात केवळ 10 हजाराची वाढ व्यापा:यांना अपेक्षित आह़े यंदा पावसाअभावी आधीच शेतक:यांना संकटांचा सामना करावा लागला होता़ वेळेवर पाऊस न पडल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे कोरडी झाली होती़ यामुळे काही शेतक:यांनी उशिराने मिरची लागवड करून पावसासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता़ यातच दोन महिन्यांपूर्वी हिरव्या मिरचीचा बाजार तेजीत असल्याने शेतक:यांनी याच मिरचीचा तोडा करून विक्री केली होती़ यातून त्यांनी नुकसान भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न केला होता़ भाजीपाला बाजारात 18 ते 25 रूपये किलो दराने विक्री झालेल्या या मिरचीमुळे लाल मिरचीचे उत्पादन अधिकाधिक कमी होऊन पथारीवर मिरची आवक कमी दिसत आह़े नंदुरबार शहरातील अनेक व्यापा:यांनी नोव्हेंबरच्या अंतिम आठवडय़ार्पयत मिरची खरेदी केली होती़ गेल्या चार दिवसात मिरची आवकच नसल्याने खरेदीही बंद पडली आह़े