शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील बोंडअळीग्रस्तांना 90 कोटींची गरज

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: February 6, 2018 13:24 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त असलेले एकूण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र आह़ेतालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 33 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात बोंडअळीने नुकसान झालेल्या 85 हजार 895 शेतक:यांना 89 कोटी 65 लाख 22 हजार 145 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े यात जिरायत व बागायत या दोन्ही क्षेत्रांचा समावेश आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त असलेले एकूण 95 हजार 802 हेक्टर क्षेत्र आह़ेतालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आह़े व आवश्यक असलेल्या मदतीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आह़े बोंडअळीग्रस्त जिरायतदार असलेल्या 52 हजार 492 शेतक:यांच्या 55 हजार 754 हेक्टरासाठी  38 कोटी 63 लाख 72 हजार 940 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़ेतर, बागायतदार असलेल्या 33 हजार 403 शेतक:यांच्या 40 हजार 47 हेक्टरसाठी 51 कोटी 1 लाख 49 हजार 205 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े जिरायतदार व बागायतदार असलेल्या 85 हजार 895 शेतक:यांचे  95 हजार 802 हेक्टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े त्यासाठी 89 कोटी 65 लाख 22 हजार 115 रुपयांच्या मदतीची आवश्यकता आह़े गेल्या अनेक दिवसांपासून तालुका प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्त क्षेत्राची पाहणी करण्यात येत होती़ परंतु काही ठिकाणी पंचनामे करण्यास अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत होत़े त्यामुळे पंचनामे करण्यासही कृषी विभागाला विलंब झाला होता़ अनेक शेतक:यांना डावलले.बोंडअळीच्या थैमानामुळे येथील शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आह़े त्यामुळे बहुतेक शेतक:यांनी आपले क्षेत्रावरील कपाशीच्या पिकावर नांगर फिरवला होता़ बोंडअळीने कपाशी खाऊन टाकल्याने शेतक:यांनी दुसरे पिक घेण्यासाठी शेत रिकामे केले होत़े परंतु यात त्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानदेखील झाले होत़े कपाशी पेरणीसाठी बि-बियाणे आदींवर मोठा खर्च करण्यात आला होता़ दुसरीकडे कृषी विभागाकडून मात्र, ज्या क्षेत्रावर सध्याच कपाशी आहे अशांचेच पंचनामे करण्यात आले होत़े त्यामुळे ज्या शेतक:यांनी कपाशी काढून टाकली आहे व दुसरे पिक घेतले आहे त्यांच्या आधीच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आह़े त्यामुळे अनेक शेतक:यांनी कृषी विभागाच्या या पंचनाम्यावर आपली नाराजी व्यक्त केली आह़े दरम्यान असे असले तरी, ज्या शेतक:यांच्या पांढ:या सोन्याला खरोखर बोंडअळीने खाल्ले आहे अशा ख:या लाभाथ्र्याची मात्र यात हेडसांड होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा बोंडअळीने थैमान घातले होत़े़ यात, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरीदेखील पुरता भरडला गेला आह़े परंतु प्रशासनाच्या चालढकलपणामुळे त्याला पहिले आसमानी व नंतर  सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आह़े जिल्ह्यात कापूस पेरणी केलेल्या शेतक:यांची संख्या एकूण 91 हजार 998 ऐवढी आह़े त्यापैकी तब्बल 85 हजार 895 शेतक:यांची बोंडअळीमुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आह़े त्यात, जिरायतदार शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आह़े जवळपास 55 हजार 754 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आह़े त्यामुळे जिरायतदार शेतकरी यात चांगला आर्थिक पेचप्रसंगात सापडला आह़े शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े