शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात बोगस ‘बी.टी.’चा यंदाही सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 12:50 IST

तस्करी व विक्री रोखण्यासाठी उपाययोजना : शेतक:यांमधील जनजागृतीचा अभाव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : जिल्ह्यात यंदाही बोगस बी.टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट  मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी जिल्ह्यातील दलालांना हाताशी धरून शेतक:यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले जात असल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे सापडलेले बोगस बी.टी. बियाणेदेखील गुजरातमधूनच आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवडीचे क्षेत्र साधारणत: 18 ते 20 हजार हेक्टर आहे. बागायतदार शेतकरी उन्हाळी कापूस लागवड करतात. याशिवाय साधारणत: 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड करीत असतात. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या 35 टक्के क्षेत्र हे एकटय़ा कापूस पिकाचे आहे. त्यामुळे कापसाचे बोगस बियाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खपविले जाते. गेल्यावर्षीदेखील तणरोधक बी.टी. बियाण्यांची मोठय़ा प्रमाणावर खासगी एजंटांमार्फत विक्री झाल्याने शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. यंदादेखील ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती.2,153 क्विंटल बी.टी. बियाणेजिल्ह्यातील साधारणत: एक लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दोन हजार 153 क्विंटल कापूस बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 538 क्विंटल, नवापूर तालुक्यात 452 क्विंटल, शहादा तालुक्यात 560 क्विंटल, तळोदा तालुक्यात 129 क्विंटल, अक्कलकुवा तालुक्यात 323 क्विंटल, धडगाव तालुक्यात 151 क्विंटल बी.टी. कापूस बियाण्यांचे नियोजन आहे. ठोस उपाययोजना करावीबोगस बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. कृषी विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु केवळ गुणवत्ता नियंत्रक पथक यंदाही नेहमीप्रमाणे स्थापन करण्यात आले आहे. ठोस कारवाईसाठी पथक नसल्याची स्थिती आहे.तणनाशक रोधक बी.टी.कपास कार्यक्षेत्रामध्ये ग्लायफॉसेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे माती प्रदूषण, हवा प्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून, मनुष्य प्राणी जीवनावर घातक परिणाम होत आहे. या ग्लायफॉसेट हे कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वरील बाब पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करणारे आहे. तसेच तणनाशक रोधक बी.टी. कापूस लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होतो. पिकाचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारच्या कापसाची लागवड करणे टाळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे व खते विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने 22 निरीक्षक नेमले आहेत.  त्यात पूर्णवेळ निरीक्षक एक व अर्धवेळ 21 जणांचा समावेश आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिका:यांनी यापूर्वीच ज्या निरीक्षकांच्या क्षेत्रात बोगस बियाणे विक्री होईल त्यांना त्यासाठी जबाबदार धरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय संबंधित विक्रेत्यांविरुद्धदेखील पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.