शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

नंदुरबारात भाजप व काँग्रेसमध्येच पारंपरिक लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:33 IST

नंदुरबार मतदारसंघ : सत्ताधारी कामाच्या बळावर जनतेपुढे जाणार, तर विरोधक गेल्या वेळच्या चुका सुधारताय

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पारंपरिक काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत काँग्रेसने मागील चुका सुधारत मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ.हीना विजयकुमार गावीत यांना आव्हान उभे राहणार आहे. काँग्रेस आघाडीतर्फे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचे नाव निश्चित आहे. त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून तयारीदेखील सुरू केली आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघाची गेल्या निवडणुकीपर्यंतची परंपरा लक्षात घेता काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा वैयक्तिक प्रभाव यामुळे खासदार डॉ. हीना गावीत या एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. नऊ वेळा निवडून आलेल्या माणिकराव गावीत यांना त्यांनी पराभूत केले होते. माणिकराव गावीत यांचे वय लक्षात घेता त्यांना यंदा उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांचीच नावे कळविण्यात आली. त्यात आमदार अ‍ॅड.पाडवी हे उजवे ठरले.विरोधक यावेळी आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची एकजूट कालच्या मोर्चात दिसून आली.भाजप-सेना युती असली तरी भाजपला सेना कशी साथ देते यावरही खासदार डॉ.हीना गावीत यांचे गणित अवलंबून राहणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीने अंतर्गत त्यांना साथ दिली होती. यावेळीही राष्टÑवादीच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.दुसरीकडे काँग्रेसला यंदा चांगली अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल हे धुळे मतदारसंघात अडकून पडल्याने शिरपूरमध्ये काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागला होता. यंदा आमदार पटेल हे नंदुरबार मतदारसंघात पूर्ण लक्ष घालणार आहेत. शहाद्याचे दीपक पाटील हे यंदा काँग्रेसकडे राहणार असून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले आहे. अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघ स्वत: अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचाच बालेकिल्ला आहेच. परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृतीमुळे या निवडणुकीपासून लांब राहणार असल्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सहा विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसकडे नवापूर, अक्कलकुवा, शिरपूर आणि साक्री मतदारसंघ आहे तर भाजपकडे केवळ नंदुरबार आणि तळोदा मतदारसंघ आहे. तळोद्याचे आमदार उदेसिंग पाडवी व खासदार डॉ.हीना गावीत यांचे पाच वर्षात जमू शकले नाही.एकूणच मोदी लाटेचा काहीसा कमी झालेला प्रभाव व काँग्रेसची आक्रमकता तर दुसरीकडे पाच वर्षातील विकास कामे व संसदेतील प्रभावी कामगिरी आणि मोदींचे वलय या बळावर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.