शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

नवापूर येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल, दारू व्यवसायातून झाला खून, दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST

नवापूर शहरातील बीएसएनएल ऑफिसच्या पुढे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एक गुजरात पासिंगच्या कारमध्ये धारदार शस्त्राने वार केलेला एका व्यक्तीचा ...

नवापूर शहरातील बीएसएनएल ऑफिसच्या पुढे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एक गुजरात पासिंगच्या कारमध्ये धारदार शस्त्राने वार केलेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन कारची पाहणी केली असता कारच्या मागच्या सीटवर एका इसमाच्या हाता-पायावर व तोंडावर धारदार शस्त्राने वार करून तोंडावर प्लॅस्टिक चिकटपट्टी चिकटविल्याचे दिसून आले. याबाबत सहा. पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप-विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक पंडित यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या. मयत कोण? त्याला जीवे मारण्याचा उद्देश काय? मारेकरी कोण, या प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मयताच्या खिशात ऑनलाइन जेवणाची ऑर्डर दिल्याची पावती होती व त्या पावतीवर त्याचा मोबाइल नंबर होता. त्यावरून मयताची ओळख पटविण्यात पथकाला यश आले. मयत हा भावेशभाई सी. मेहता (रा. घनश्यामभाई सोसायटी, सुरत, गुजरात) असल्याचे स्पष्ट झाले.

मयत सुरतहून नवापूर येथे का आला? त्याचे मारेकरी कोण? व त्याला का मारण्यात आले, हे प्रश्न पोलिसांपुढे होतेच. पोलिसांनी घटनेच्या आजूबाजूच्या परिसरातील तसेच नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही. फूटेज तपासले. त्यात १६ जून रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर पाच ते सहा जण हॉटेलमध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसले. १७ जून रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल उरविशा येथेदेखील ते पाच ते सहा संशयित आरोपी दिसून आल्याने आरोपी निश्चित झाले. मयत हा सुरत येथील असल्याने व मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फूटेजवरून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एक पथक तत्काळ सुरत येथे रवाना करून स्वत: गुन्ह्याबाबत वेळोवेळी माहिती घेत होते.

नंदुरबार पोलीस पथकाने सलग तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन सुरतसारख्या शहरात बातमीदार तयार करून सी.सी.टी.व्ही. फूटेजमध्ये दिसत असलेले संशयित हे सुरत, नवसारी येथे दारूची अवैध तस्करी करणारे व पैसे घेऊन गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळवली. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्या अनुषंगाने पोलिसांचे अजून एक पथक तयार करून नवसारी गुजरात राज्यात रवाना केले. सुरत येथील पथकाने अथक परिश्रम घेत सी.सी.टी.व्ही. फूटेजमध्ये दिसत असलेला एका आरोपीचे घर शोधून काढले. पथकाने संशयित आरोपीच्या घराच्या आजूबाजूला सलग चार दिवस वेशांतर करून पाळत ठेवत एका संशयित आरोपीला सुरत शहर गुन्हे शाखेच्या मदतीने शिताफीने बेड्या ठोकल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश रमेशभाई जोरेवार (२१, रा. आंबेडकर नगर, सुरत) असे सांगितले. त्यास खुनाबाबत अधिक विचारले असता त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितले. त्यास मयताला मारण्याचा हेतू काय, असे विचारले असता त्याने अवैध दारू तस्करीच्या व्यवसायातील वादातून खून केला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला असता २३ जून रोजी गुन्ह्यातील अजून एक आरोपी आकाश अरविंदभाई ओड (२८, रा. अंबिका नगर, सुरत) यास ताब्यात घेण्यात पथकास यश आले.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन खून का केला, याबाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सह पोलीस निरीक्षक धीरज महाजन, संदीप पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रवींद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकूर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.