लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा गावातून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या गावशिवारात आढळून आला होता़ याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम आह़ेकलाबाई दयाराम गवळे (50) ह्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या़ त्यांचा मृतदेह मंगळवारी शहादा-शिरपूर रस्त्यालगत शेतात संशयास्पदरित्या आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती़ मयत कलाबाई यांच्या कुटूंबियांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता़ मंगळवारी प्राथमिक तपासानंतर पोलीसांच्या हाती ठोस असे काही लागले नव्हत़े बुधवारी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी दीपक गो:हे, योगेश सोनवणे, आनंदा मराठे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती़ दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद येथे पाठवण्यात आले होत़े परंतू याठिकाणी तज्ञ नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही़ 24 तासांच्या जवळपास मृतदेह येथेच पडून असल्याने कुटूंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती़ नंदुरबार जिल्हा रुग्णालयातून डॉ़ रोहन थोरात यांना बोलावण्यात आल्यानंतर त्यांनी शवविच्छेदनाची कारवाई पूर्ण केली होती़ सारंगखेडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून तपास तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सरोदे करत आहेत़
महिलेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:08 IST