लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : खान्देशातील सर्वात जुनी पालिका म्हणून ओळख असणाऱ्या तळोदा पालिकेचे कार्यालय आता नवीन वास्तूत स्थलांतरीत होणार आहे. येत्या नवीन वर्षात मार्चपोवतो तळोदा पालिकेचे सर्व प्रमुख विभाग नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. जुन्या इमारतीत जागेअभावी विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्रा आता पालिका नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यानंतर कामांची गतीदेखील वाढणार आहे.तळोदा पालिका ही इंग्रजांच्या काळात १८६७ पासून शहरातील स्मारक चौक परिसरात असणाºया इमारतीत भाडे तत्वावर सुरू आहे. मात्र याठिकाणी अतिशय कमी जागेत इतके वर्ष पालिकेचे कामकाज सुरू होते. खान्देशातील सर्वात जुनी पालिका म्हणून तळोदा पालिका ओळखली जाते. याठिकाणी मुख्याधिकारींचे छोटेसे दालन आहे. तसेच नगराध्यक्ष, बांधकाम विभागाची मोडकळीस आलेली खोली, स्वच्छता विभाग, जन्म मृत्यू विभाग अतिशय अरूंद जागेत सुरू आहेत. त्यामुळे कर्मचारी व प्रशासनास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरते. आता मात्र नवीन इमारतीत सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज अशी पालिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, ही वास्तू मटन मार्केटच्या समोर आहे. दुमजली असणाºया या इमारतीत दुसºया मजल्यावर नवीन पालिका स्थलांतरीत होणार आहे. शेजारीच पालिकेचे नवीन दोन व्यापारी संकुलदेखील तयार झाले आहेत. नवीन स्थलांतरीत होणाºया पालिकेत सर्वात महत्वाचे सभागृह अतिशय भव्य राहणार आहे. यात पालिकेतील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना दरवेळी निर्माण होणारी जागेची अडचण पाहता आधुनिक सभागृहात सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. या भागातील व्यापारी संकुलाचे भूमीपूजन माजी नगराध्यक्षा हेमलता डामरे यांच्या कार्यकाळात झाले तर काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांच्या काळात नवीन पालिका इमारत व सभागृहाचे काम हाती घेण्यात आले. काम वेळेवर पूर्ण झाले नाही. आता मात्र नगराध्यक्षांच्या काळात कामास गती मिळाल्याने लवकरच नवीन इमारतीत स्थलांतरीत होणार आहे.
पालिकेला मिळणार नवी इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:44 IST