शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:00 IST

नंदुरबार : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी परवेज खान करामत खान यांची निवड करण्यात आली़  शनिवारी दुपारी 12 वाजता पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी ...

नंदुरबार : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी परवेज खान करामत खान यांची निवड करण्यात आली़  शनिवारी दुपारी 12 वाजता पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात उपनगराध्यक्षासह चार स्विकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली़ या निवड प्रक्रियेवर भाजपाच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला होता़  सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ निवडणूक प्रक्रियेचे कामकाज मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पाहिल़े शिवसेनेच्या शोभा मोरे यांचा उपनगराध्यक्षपदाचा वर्षभराचा तसेच पालिकेच्या चार स्विकृत नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शनिवारी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती़ या सभेपूर्वी सकाळी 10 वाजेपासून उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन मागवण्यात आले होत़े यात सत्ताधारी ्रकाँग्रेसतर्फे परवेज खान करामत खान यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आल़े या अर्जाला कैलास पाटील हे सूचक तर किरण रघुवंशी हे अनुमोदक होत़े दरम्यान भाजपातर्फे नगरसेवक निलेश सुदाम पाडवी यांनी परवेज खान यांच्याविरोधात अर्ज दाखल केला़ त्यास सूचक भाजपाचे गटनेता अॅड़ चारुदत्त कळवणकर तर अनुमोदक गौरव चौधरी होत़े दोघांच्या अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर 12 वाजेपासून विशेष सभा बोलावण्यात आली़ या सभेत दोघांनी माघार न घेतल्याने नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी हात उंचावून मतदान करण्याचे नगरसेवकांना सूचित केल़े त्यांच्या या सूचनेवर भाजपाचे गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी आक्षेप घेत गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्याची मागणी केली़ परंतू शासनाने गुप्त मतदान पद्धती बंद केल्याचे सांगून नगराध्यक्षा रघुवंशी यांनी ही मागणी फेटाळून लावली़ यानंतर काँग्रेसतर्फे उपस्थित असलेल्या 25 नगरसेवकांनी हात उंचावून परवेज खान यांना पाठिंबा देत उपनगराध्यक्षपद बहाल केल़े उपनगराध्यक्ष निवडीनंतर  काँग्रेसतर्फे स्विकृत नगरसेवकपदी राकेश अशोक खलाणे, शिवाजी राजाराम येडगे, मोहसीन खान जाकीर खान पठाण यांची नावे जाहिर करण्यात येऊन स्विकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली़  भाजपातर्फे स्विकृत नगरसेवक म्हणून नामनिश्चिती करण्यात आलेल्या सदानंद पृथ्वीराज ङोरवार यांची निवड करण्यात आली़ या निवडीनंतर काँग्रेसतर्फे नवनियुक्त उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य यांची उघडय़ा जीपमधून मिरवणूक काढत आनंद व्यक्त करण्यात आला़ यात काँग्रेसच्या नगरसेवकांसह कार्यकर्ते सहभागी झाले होत़े