शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चेतक फेस्टिवलमध्ये नृत्य स्पर्धेत मुंबईच्या ग्रुपची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:50 IST

सारंगखेडा, ता़ शहादा येथे चेतक फेस्टिवलअंतर्गत रोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहे़ सारंग नृत्य स्पर्धेत वी. आर. ब्रदर्स (मुंबई) या ग्रुपने प्रथम, ट्रिझियन्स ग्रुप (पुणे) द्वितीय तर नटराज दर्शन ग्रुप (नालासोपारा)ने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.

ठळक मुद्देमिस सारंगी व मिसेस सारंगी स्पर्धा चुरशीचीतीनही संघांना रोख बक्षिसासोबत स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रमिस सारंगीचा किताब दोंडाईचा येथील मानसी पाठक यांना

आॅनलाईन लोकमतसारंगखेडा,दि.१८ : सारंगखेडा, ता़ शहादा येथे चेतक फेस्टिवलअंतर्गत रोज विविध स्पर्धा घेण्यात येत आहे़ सारंग नृत्य स्पर्धेत वी. आर. ब्रदर्स (मुंबई) या ग्रुपने प्रथम, ट्रिझियन्स ग्रुप (पुणे) द्वितीय तर नटराज दर्शन ग्रुप (नालासोपारा)ने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.मुंबईच्या वी. आर. ब्रदर्सला एक लाख रुपये, व्दितीय ‘ट्रिझियन्स’ ग्रुपला ५१ हजार रुपये, तसेच नटराज दर्शन ग्रुपला ३१ हजाराचे बक्षीस देण्यात आले. तीनही संघांना रोख बक्षिसासोबत स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.परीक्षक म्हणून चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, मराठी सिनेअभिनेते नयन जाधव व संतोष भांगरे यांनी काम पाहिले़ सूत्रसंचालन दिनेश कोयडे यांनी केले़समूह नृत्य स्पर्धेत मूळ सारंगखेडा येथील व सध्या जळगाव येथे रहिवासी असलेली सात वर्षीय चार्वी रंधे हिने ‘मला जाऊ द्या ना घरी’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करीत रसिकांची मने जिंकली.मिस सारंगी व मिसेस सारंगी स्पर्धा चुरशीचीचेतक फेस्टिवलअंतर्गत घेण्यात आलेली मिस सारंगी व मिसेस सारंगी स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली़ मिसेस सारंगी २०१७ चा किताब नंदुरबार येथील शीतल चौधरी हिने पटकावला़ त्यांनी तिन्ही फेºयांमध्ये उत्कृष्ट काम केले़ ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते़ मिसेस सारंगीचे व्दितीय पारितोषिक पूनम भावसार यांना मिळाला़ तृतीय स्थानी हर्षदा भावसार या राहिल्या़मिस सारंगीचा किताब दोंडाईचा येथील मानसी पाठक यांना मिळाला़ ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते़ मिस सारंगी स्पर्धेत भारती नायक व शिवानी परदेशी यांचा अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक आला़ त्याचप्रमाणे बेस्ट स्माईल अनुराधा मोरे, बेस्ट वॉक रिता पाटील, बेस्ट फोटो ग्राफिक सुजाता भावसार, बेस्ट फेस मयुरा पारस, बेस्ट पर्सनालिटी ममता सोनवणे आदींना विविध गटात पारितोषिक देण्यात आले़ परीक्षक म्हणून पूनम बेडसे, श्रध्दा अजमेरा, ऐश्वर्या रावल, तेजल चौधरी, सुनंदा पाटील, मेघा खारकर, सुजाता बोरसे यांनी काम पाहिले़