जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिस कक्षात आजवर एकूण ३७ जणांवर उपचार करण्यात आले. यात सात जण पूर्णपणे बरे करण्यात आले होते. तर २१ जणांना इतर आजारही असल्याने दुसऱ्या शहरात उपचारांसाठी पाठवण्यात आले. उर्वरित जणांनी बरे वाटत असल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. सर्वांना याठिकाणी ॲम्फोटोरिसीन बी इंजेक्शन्सचे डोस देण्यात आले होते. प्लेन, लिंपोसोमल, इम्लशन आणि लिक्विड कॉम्पलेक्स आदी प्रकारातील ॲम्फोटोरिसीन बी इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले होते. येत्या काळातही म्युकरमायकोसिसचा त्रास झाल्यास तो बरा करण्यासाठी ८४५ इंजेक्शन्सचे डोस तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
याबाबत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कल्पेश चव्हाण यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, कक्षात उपचार घेत असलेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. ज्यांना बाहेर गावी रेफर केले होते. त्यांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. सध्या तरी म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही.