दरम्यान, खासदार डॉ.हीना गावीत यांनी सांगितले की, कोविड टेस्टिंग वाढवा तसेच लसीसंदर्भातील गैरसमज दूर करून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना लस देण्यास सांगितले. तसेच येणारी तिसरी लाट ही महाभयंकर असून, सद्य:स्थितीतच कोरोना वाढीचा वेग थांबवा. यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तरी ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक काम असल्यास मास्क वापरा व नियमित हात स्वच्छ धुवा, शासकीय नियमांचे पालन करा असे आवाहन केले.
दरम्यान, खासदार डॉ.हीना गावीत यांनी सांगितले की, कोविड टेस्टिंग वाढवा तसेच लसीसंदर्भातील गैरसमज दूर करून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना लस देण्यास सांगितले. तसेच येणारी तिसरी लाट ही महाभयंकर असून, सद्य:स्थितीतच कोरोना वाढीचा वेग थांबवा. यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. तालुक्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तरी ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक काम असल्यास मास्क वापरा व नियमित हात स्वच्छ धुवा, शासकीय नियमांचे पालन करा, असे सांगत साक्री तालुक्यातील २६ गावांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने एकही कोरोना रुग्ण नाही. त्यांचा आदर्श प्रत्येक गावाने घेण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार म्हणून जिल्ह्याला ६८ व्हेंटिलेटर दिल्याचेही सांगितले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत, डॉ. रेखा शिंदे, श्रीकांत पाटील, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पवार, भरत पवार, गौतम भिलाव, साजन शेवाळे, विनाेद शेवाळे, रवि भिलाव आदी उपस्थित होते.
नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. पावसाळ्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ताब्यात घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.