शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:33 IST

निवडणूक आयोगाचे सुतोवाच : आरक्षणासंदर्भात घटनादुरूस्ती मात्र अद्यापही नाही

नंदुरबार : मुदतवाढ देण्यात आलेल्या नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. याच आदेशात नंदुरबारसह चार जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात देखील सुतोवाच केले आहे. यामुळे राजकीय पक्ष आणि प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत.दरम्यान, नंदुरबारसह चार जिल्हा परिषदेच्या आरक्षणासंदर्भात विधानसभेत घटनादुरूस्ती करावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुका होणार नाही स्पष्टच असल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे.नंदुरबार जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत सहा पंचायत समितींची मुदत नोव्हेंबर २०१८ मध्ये संपली होती. या अंतर्गत काढण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात काहीजण न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात यासंदर्भात सुनावणी झाली. राज्य शासनाने यासंदर्भात विधीमंडळात घटनादुरूस्ती करून न्यायालयाला कळवावे असे सुचीत केले होते. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत डिसेंबर महिन्यात संपली होती. परंतु राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात देखील यासंदर्भात विधेयक आणले नव्हते. परिणामी शासनाला नंदुरबारसह चारही जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना मुदतवाढ द्यावी लागली होती. त्यालाही तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे.या कालावधीत निवडणूक आयोगाने राज्य शासनाला उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्वरीत निर्णय घेण्याचे सुचीत केले होते. परंतु शासनाने काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १३ पंचायत समितींच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.नंदुरबार जि.प. व पं.स.बाबत स्वतंत्र निर्णय नाहीनंदुरबारसह इतर तिन्ही जिल्हा परिषदांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मात्र स्वतंत्र निर्णय किंवा आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे संभ्रम कायम आहे. कायदेतज्ज्ञ आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आरक्षणासंदर्भातील घटना दुरूस्त विधीमंडळात होत नाही तोपर्यंत निवडणुका शक्य नाहीत. घटना दुरूस्ती करून तो अहवाल न्यायालयाला सादर करावा लागेल. त्यानंतर न्यायालय दाखल केलेल्या संबधीत रिट याचिकांवर निर्णय देईल. त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.मुदतवाढ कायमसध्या राज्य शासनाने डिसेंबर महिन्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समितींना मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतवाढीचा कालावधी मात्र आदेशात नमुद करण्यात आलेला नाही. ही बाब लक्षात घेता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती बरखास्त करणे किंवा प्रशासक बसवणे हे शक्य नसल्याचेही बोलले जात आहे.