शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

महसूली दर्जाच्या 73 गावांमध्ये हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:51 IST

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील वनगावांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये मार्गी लावला होता़ एकूण 73 वनगावांना महसूली  दर्जा ...

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील वनगावांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये मार्गी लावला होता़ एकूण 73 वनगावांना महसूली  दर्जा प्राप्त झाल्यानंतर आता या गावांना ग्रामपंचायत निर्मितीच्या हालचाली सुरु झाल्या असून येत्या 26 जानेवारी रोजी तसे ठराव करण्यात येणार असल्याची माहिती आह़े हे ठराव पंचायत समित्यांमार्फत जिल्हा परिषदेत आल्यानंतर जून 2019 र्पयत या ग्रामपंचायती अस्तित्वात येणार असल्याचे खात्रीशीरपणे सांगितले जात आह़े    धडगाव तालुक्यातील 73  गावे वनविभागाच्या हद्दीत असल्याने त्यांना वनगावांचा दर्जा देण्यात आला होता़ 1971 मध्ये वनजमिन अधिनियम संरक्षण कायदा लागू झाल्यापासून ही गावे वनगावे म्हणून घोषित होती़ वनगावे असल्याने याठिकाणी महसूली योजना आणि इतर लाभ देण्यात येत नव्हत़े यातून तेथील ग्रामस्थ हे शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपासून ंवंचित होत़े 47 वर्षापासून येथील ग्रामस्थ सुविधांसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना महसूली दर्जा देण्याची मागणी करत होत़े या मागणीवर प्रशासनाने नोव्हेंबर 2018 मध्ये कारवाई करुन सर्व 73 गावे ही महसूली करण्याचे आदेश काढले होत़े ही गावे महसूली झाल्यानंतर प्रशासनाने पुढील प्रक्रियांबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या-त्या ग्रुप ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत़ या सूचनानंतर तेथील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत निर्मितीला होकार दर्शवत ग्रामसभा घेऊन विभाजनाचे प्रस्ताव देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आह़े 26 जानेवारी रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये याबाबतचे ठराव मजूंर झाल्यास धडगाव तालुक्यातील 10 ग्रुप ग्रामपंचायतींचे विभाजन होणार आह़े धडगाव तालुक्यात एकूण 99 महसूली गावे नोव्हेंबर 2018 पूर्वी होती़ यात  73 समावेश होऊन ही संख्या आता 163 झाली आह़े नवीन ग्रामपंचायतींमुळे धडगाव तालुक्याच्या विकासाला वेग येऊन पेसांतर्गत निधी तसेच विकासकामांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े राजबर्डी ग्रामपंचायत अंतर्गत शेलकुवी, कामोद बुद्रुक, खर्डी बुद्रुक, शिंदवाणी, कात्रा, तेलखेडी, कुवरखेत, कुकलट, वलवाल ही गावे आहेत़चिंचकाठी ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत पिंपळबारी, चांदसैली, चिंचकाठी व माऴ चिखली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चिखली, बोरी, बिलगाव, त्रिशुल, साव:या दिगऱ गेंदा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत गेंदा, जुनाना, शेफदा, खुटवडा़कात्री ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत वाहवाणी, पौला़ मांडवी बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीत मक्तरङिारा, टेंभुर्णी, झुम्मट, खडकाले बुद्रुक, खडकाले खुर्द, निगदी, वावी, बोदला, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द या गावांचा समावेश आह़े बिजरी ग्रामपंचायत अंतर्गत बिजरी, शिरसाणी, गौ:या, सूर्यपूर (छिनालकूवा), कामोद खुर्द, जर्ली, मनखेडी़ तोरणमाळ ग्रुपग्रामपंचायतंतर्गत केलीमोजरा, केलापाणी, फलई, खडकी, सिंदीदिगर, झापी, तोरणमाळ, भादल, रोषमाळ खुर्द ग्रामपंचायतीत आकवाणी कुकतार, कुंभरी, गोराडी, थुवाणी, पिंपळचौक,अट्टी, केली, रोषमाळ खुर्द, भरड, शिक्का, डोमखेडी, शेलगदा, निमगव्हाण़ भूषा ग्रुपग्रामपंचायतीत भूषा, उडद्या, वरवाली, खर्डी खुर्द, सादरी, लेकडा, साव:या, भमाणे, भाबरी या गावांचा समावेश आह़े