नंदुरबार : १९ वर्षीय युवतीने विवाह करण्यास नकार दिल्याने तिचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान विनयभंग करणाऱ्याने युवतीच्या नातलगांच्या वाहनाचेही नुकसान केले़देसाईपुरा भागात राहणाºया १९ वर्षीय युवतीला लोकेश दिपक चौधरी रा़ सिद्धीविनायक चौकाजवळ, नंदुरबार नामक युवकाने लग्नाची मागणी घातली होती़ त्यास युवतीने नकार दिला होता़ याचा राग आल्याने गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास संबधिताने युवतीच्या घरी जावून शिवीगाळ केली होती़ यादरम्यान त्याने एमएच ३९ एबी २७७८ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले होते़ एवढ्यावरच न थांबता लोकेश चौधरी याने युवतीची स्कूटी ढकलून देत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ युवतीच्या फिर्यादीवरुन लोकेश चौधरी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़
लग्न करण्यास नकार दिल्याने युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:52 IST