शहादा : तालुक्यातील सोनवदतर्फे मोहिदा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी कूपनलिकेची इलेक्ट्रीक मोटार, वायर व इतर साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.सोनवदतर्फे मोहिदा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून काही शेतकऱ्यांच्या कूपनलिकेला पाणी आहे तेथून पाण्याची व्यवस्था होत आहे. परंतु गेल्या आठवड्यात याच कूपनलिकांच्या इलेक्ट्रीक मोटारी, वायर व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले. गावात बांधलेल्या हाळमध्ये पाणी टाकून महिलांना कपडे धुण्यासाठी व्यवस्था करण्यात येते. जनावरांचा पाणी पिण्याचा प्रश्नही सुटतो. शुक्रवारी रात्री काही अज्ञात चोरांनी गावाला पाणीपुरवठा करणाºया खाजगी कूपनलिकेतून इलेक्ट्रीक मोटार, वायर व इतर साहित्य चोरुन नेले. या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वैतागले असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात गावाला पाणीपुरवठा करणाºया कूपनलिकेची मोटार व वायर चोरुन नेवून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया चोरट्यांचा पोलिसांनी तपास करुन कडक कारवाई करावी व सोनवद गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.