नवापूर : नवापूर येथील नवरंग रेल्वे गेटवर ट्रॉलाखाली दुचाकी घुसल्याने झालेल्या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले. तेथे असलेल्या इतर वाहनचालकांनी लागलीच मदतकार्य केल्याने मोठी दुर्घटना टळली.नवापुरातील महामार्गावरील नवरंग रेल्वे गेट दुपारी बंद होते. रेल्वे गेल्यानंतर वाहने काढण्यासाठी प्रत्येकजण घाई करीत होता. त्यातच एक दुचाकीस्वार आपल्या दोन चिमुकल्यांसह गेटमधून दुचाकी काढत असतांना त्याच्या पुढे चालणाऱ्या ट्रॉलाच्या मागील चाकाखाली आला. यावेळी इतर वाहनचालकांनी आरडाओरड केल्यानंतर ट्रॉला चालकाने जागेवरच वाहन उभे केल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी दुचाकीवरील दोन्ही चिमुकले व दुचाकीस्वार याला बाहेर काढले. त्यानंतर दुचाकी ट्रॉलाखालून काढली. यावेळी येणारी किंवा जाणारी रेल्वे नसल्यामुळे अनर्थ टळला. या ठिकाणी नेहमीच रेल्वेगेट बंद होतांना व उघडतांना अशी समस्या निर्माण होते. त्यातच दोन रुळामधील रस्ताही खराब झाला आहे.
नवापूरात ट्रॉलाखाली दुचाकी घुसली, दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 11:58 IST