लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच्या दुचाकीवर स्फोटक पदार्थ टाकून ती पेटवून देण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला़ या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आह़े राजेशकुमार ओमप्रकाश गुप्ता याच्या मालकीची एमएच 19 बीएफ 8047 ही 10 हजार रुपये किमतीची दुचाकी गावातील ग्रामपंचायत चौकातील घरासमोर लावली होती़ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घराबाहेर धूर आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने बाहेर पाहिले असता, दुचाकी पेटवून देण्यात आल्याचे दिसून आल़े दुचाकीला स्फोटक पदार्थ लावून पेटवण्यात आल्याचे पोलीसांनी म्हटले आह़े याबाबत राजेशकुमार गुप्ता याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील करत आहेत़
सारंगखेडय़ात एकाची मोटारसायकल जाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:43 IST