लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : छत्तीसगड राज्यातील दुर्ग शहरात सिंधी समाजातील युवकांवर पोलीसानी केलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात सिंधी समाज बांधवांनी मंगळवारी मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आल़ेसकाळी 10 वाजता सिंधी कॉलनी येथून मोटार सायकल रॅलीला प्रारंभ झाला होता़ उड्डाणपूल मार्गे हाटदरवाजा, शास्त्री मार्केट, माणिक चौक, टिळक रोड, साक्रीनाका या मार्गाने नवापूर चौफुलीवर रॅली आल्यानंतर समाजातील ज्येष्ठांनी पायी मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल़े जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिल़े त्यात म्हटले आहे की, सिंधी समाज शांतताप्रिय समाज आहे. देशाच्या फाळणीनंतर सिंध राज्य व तेथील मालमत्ता वगैरे सोडून आल्यानंतर देशातच कष्ट करून मेहनत मजुरी करून आपला व्यवसाय चालवितात. सिंधी समाजाच्या कोणीही व्यक्ती देशात कोठेही वाईटकृत्य करत नाही व कुणाशी भांडण ही करत नाही असे असताना सुद्धा छत्तीसगड येथील दुर्ग शहरात एका कारचालकाने सिंधी समाजाच्या युवक व त्याच्या भावावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.त्यानंतर पोलिस अधिका:यांनी दोघा भावांवर अन्याय, अत्याचार करून अपमानास्पद वागणूक दिली. अशा पोलीस अधिका:यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आह़े प्रसंगी सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष नारायणदास वाघेवा, लाडकाणा पंचायतीचे अध्यक्ष नामकराम गुरुबक्षाणी, रियासत पंचायतीचे अध्यक्ष नारायणदास वाघेवा, अप्पर सिंध पंचायतीचे अध्यक्ष शंकरलाल तलरेजा, पंचायतीचे अध्यक्ष शामलाल चंचलाणी, प्रकाश नानकाणी, राजकुमार खानवाणी, माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया, नगरसेवक राकेश हासाणी, शत्रुज्ञ बालाणी, कमल ठाकूर, लखमीचंद नानकाणी, डॉ. अजरुन लालचंदाणी, डॉ. राजेश केसवाणी, चंद्रलाल मंगलाणी, राजकुमार मंदाणी, मोतीराम बालाणी पवन कटारिया, अजय सोनार, कन्हैया झामनाणी, रवी कामोरा, धनराज धमाणी उपस्थित होते.
नंदुरबारात सिंधी समाजबांधवांकडून मोटारसायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:13 IST