शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

घरी वाट बघत होती आई पण त्याने गाठली सिताखाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ, ता. धडगाव येथील सीताखाईत उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : तोरणमाळ, ता. धडगाव येथील सीताखाईत उडी घेत युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती.  मृत युवक हा रविवारी सकाळी मध्यप्रदेशातील राखी या गावाहून वडिलांकडून १०० रुपये घेत घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक तोरणमाळ येथे दाखल झाले होते. यावेळी त्याची आई घरी वाट बघत असल्याचे सांगत नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.राजेंद्र बलज्या पटले (वय २५) रा. राखी बुद्रूक (मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. रविवारी दुपारी तोरणमाळच्या सीताखाई पाँईटवर अंगात लाल शर्ट व पांंढरी जिन्स पॅन्ट परिधान केलेल्या युवकाने धावत जाऊन दरीत उडी घेतली. दरम्यान, उडी घेतली त्यावेळी जोरदार आरोळी मारल्याने परिसरातील जडी-बुटी विक्रेतेही मदतीला धावले होते. परंतु तोवर दरीत पडून युवकाचा मृत्यू झाला होता. मयत युवकाने आत्महत्येपूर्वी जडीबुटी विक्रेत्याकडे पाणी मागितले होते. यावेळी त्याने मध्य प्रदेशातील राखी-भासकी येथील असल्याची माहिती दिली होती. त्यातून पोलिसांनी शोध घेतल्यावर त्याची ओळख पटली. दरम्यान, रविवारी झालेल्या या प्रकारानंतर सीताखाईत उतरण्यासाठी साधने न मिळाल्याने सोमवारी दुपारी म्हसावद पोलीस ठाण्याचे तोरणमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदू साबळे, दिलीप सूर्यवंशी, करमसिंग चौधरी यांच्या मदतीने तोरणमाळ येथील जीवन रावताळे व नागरिकांनी दरीत उतरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला.युवकाने सीताखाईत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती परिसरात पसरताच युवकाचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. राजेंद्र पटले हा युवक रविवारी सकाळी वडिलांकडून १०० रुपये घेत घेऊन घरुन निघाला होता. तो तोरणमाळ येथे नेमका कसा पाेहोचला तसेच आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेमुळे तोरणमाळ परिसरात खळबळ उडाली आहे. तोरणमाळ येथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. या ठिकाणी खडकी पॉईंट, सीताखाई पॉईंट या आत्महत्येचे प्रकारही वाढत असल्याने चिंता वाढत आहेत.

रात्रभर मृतदेह दरीत अन् ग्रामस्थांचा पहारा पोलीसांकडून मृतदहे बाहेर काढण्यासाठी साधनांची जुळवाजुळव केली जात असताना ग्रामस्थही मदत करत होते. रात्री अनेक जण सिताखाई पाॅईंट भागात थांबून होते. त्यांच्याकडून मृतदेह जंगली श्वापदे उचलून नेवू नयेत यासाठी लक्ष ठेवले जात होते. सोमवारी दुपारी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ दरीत उतरल्यानंतरही अनेक जण मदतीला धावून येत मदतकार्यात सहभागी झाले.